-
भारताच्या २३ वर्षीय नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमधील पुरुष भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं आणि इतिहास रचला. भारतासाठी हा मोठा सुवर्णक्षण ठरला. यानंतर सर्वच स्तरावरुन त्याच्यावर कौतुकाची वर्षाव सुरु आहे.
-
जगभरात नीरज चोप्राचे यशाचा आनंद साजरा होत असताना दुसरीकडे त्याचे प्रशिक्षक उवे हॉन यांचे कौतुक केले जात आहे.
-
नीरजच्या यशात हॉन यांचा तेवढाच वाटा आहे. नीरज चोप्राचे प्रशिक्षक उवे हॉन यांच्या नावावर भालफेकीत जागतिक रेकॉर्डची नोंद आहे.
-
जगात १०० मीटरहून जास्त लांब भाला फेकणारे हॉन हे एकमेव आहेत. उवे हॉन हे जगातील एकमेव खेळाडू आहेत ज्यांनी १०४.८० मीटर लांब भाला फेकला होता.
-
मात्र १९८६ मध्ये भालाफेक खेळाचे नियम बदलण्यात आले. त्यानंतर रेकॉर्डची पुन्हा सुरुवात झाली. त्यामुळे त्यांची ऐतिहासिक नोंद होता होता राहिली.
-
हॉन यांनी १९९९ पासून इतर स्पर्धकांना भाला फेकण्याच्या प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. हॉन यांनी चीनच्या Zhao Qinggang यालाही प्रशिक्षण दिले आहे
-
विशेष म्हणजे हॉन यांना नीरज चोप्रावर पूर्ण विश्वास होता. नीरज ९० मीटरपेक्षा अधिक दूरवर भाला फेकू शकतो. मी फक्त नीरजला भालाफेकीचे तंत्र सुधारण्यास मदत केली, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. (फोटो सौजन्य – ट्वीटर)

१२ राशींच्या आठवड्याची सुरुवात कशी होणार? कोणाची चिडचिड कमी तर कोणाची कामे सुरळीत पार पडणार; वाचा राशिभविष्य