-
भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने शनिवारी ७ ऑगस्ट रोजी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णाध्याय लिहिला.
-
२३ वर्षीय नीरजने एकंदरीतच इतिहास घडवला.
-
नीरजने भालफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पहिल्याच प्रयत्नात ८७.०३ मीटर तर दुसऱ्या प्रयत्नात ८७.५८ मीटरपर्यंत भाला फेकत सुवर्णपदकावर नाव कोरलं.
-
या सुवर्ण कामगिरीनंतर नीरजवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते सामान्यांपर्यंत सर्वांनीच त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.
-
सोशल मीडियावर नीरजविषयी अनेक गोष्टी सर्च केल्या जात आहेत.
-
नीरज दिसायला देखील हॅण्डसम आहे.
-
त्याने ऐतिहासिक कामगिरी करत सर्वांची मने तर जिंकली. त्याच प्रमाणे तो अनेक तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला आहे.
-
नीरजची गर्लफ्रेंड आहे का? हे जाणून घेण्यासाठी अनेक तरुणी उत्सुक होत्या.
-
सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा पडला आजारी
-
या मुलाखतीमध्ये त्याला त्याच्या गर्लफ्रेंडविषयी विचारण्यात आले होते.
-
त्यावर उत्तर देत त्याने, 'नाही, माझी गर्लफ्रेंड नाही. सध्या मी संपूर्ण लक्ष खेळावर केंद्रीत केले आहे' असे उत्तर दिले आहे.
-
नीरजचा जन्म २४ डिसेंबर १९९७ साली झाला आहे.
-
हरयाणामधील पानिपत येथील खांदरा गावामधील एका शेतकरी कुटुंबामध्ये नीरजचा जन्म झाला.
तर काहींनी नीरजच्या कामगिरीचे कौतुक वेगळ्या पद्धतीने केले आहे, -
यापूर्वी नीरजने आशियाई खेळ, राष्ट्रकुल खेळ, आशियाई चॅम्पियनशिप, दक्षिण आशियाई खेळ आणि जागतिक कनिष्ठ स्पर्धेत सुवर्ण पदके जिंकली आहेत.
-
नीरज चोप्राने आपले भालाफेक कौशल्य सुधारण्यासाठी जर्मनीच्या बायोमेकॅनिक्स तज्ञ क्लाऊस बार्टोनिट्झ यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आहे. तेव्हापासून त्याच्या कामगिरीत सातत्य राहिले आहे.
-
भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या म्हणजेच स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या (साइ) माहितीनुसार नीरजच्या कोपरावर २०१९ साली मुंबईमध्ये महत्वाची शस्त्रक्रीया पार पडली. त्यानंतर डॉक्टर कॅल्स बार्टोनिट्स यांना नीरजचे खासगी प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले. यासाठी सरकारने त्यांना पगाराच्या स्वरुपात १ कोटी २२ लाख २४ हजार ८८० रुपये दिले आहेत.
-
तसेच नीरजसाठी एकूण चार भाले विकत घेण्यात आले.
-
त्याची एकूण किंमत ४ लाख ३५ हजार रुपये इतकी असल्याचं ‘साइ’ने सांगितलं आहे.
-
भारत सरकारने नीरजच्या प्रशिक्षणासाठी ४ कोटी ८५ लाख ३९ हजार ६३८ रुपये खर्च केले आहे. हा सर्व निधी नीरजचं प्रशिक्षण, परदेशात झालेल्या स्पर्धा अशा सर्व ४५० दिवसांचा खर्च असल्याचं ‘साइ’कडून सांगण्यात आलं आहे.

India On Trump : “राष्ट्रीय हितांचं रक्षण करण्यासाठी सर्व…”, अमेरिकेने २५ टक्के टॅरिफ लादल्यानंतर भारताचं सडेतोड उत्तर