-
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने लॉर्ड्सवर विजयी तिरंगा फडकावत मोठे यश मिळवले. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने इंग्लंडला १५१ धावांनी हरवत १-० अशी आघाडी घेतली.
-
लॉर्ड्सवर रंगलेल्या सामन्याच्या शेवटच्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी २७२ धावांची गरज होती. पण यजमान संघ अवघ्या १२० धावांवर सर्वबाद झाला.
-
मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह यांचे अष्टपैलू योगदान तर मोहम्मद सिराज, इशांत शर्मा यांनी केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडचा धुव्वा उडवला.
-
भारतासमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. इंग्लंडचा एकही फलंदाज झुंज देताना दिसला नाही. त्यांचे सर्व फलंदाज ५१.५ षटकात १२० धावांत गारद झाले.
-
भारताकडून मोहम्मद सिराजने ४, इशांतने ३ तर मोहम्मद शमीने २ बळी घेत इंग्लंडच्या डावाला सुरूंग लावला.
-
तर पहिल्या डावात शतकी खेळी करणाऱ्या भारताच्या लोकेश राहुलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
-
लॉर्ड्स कसोटीत भारताला संपूर्ण टीममुळे ऐतिहासिक विजय मिळाला असला तरी यात असे काही खेळाडू आहेत, ज्यांच्या कामगिरीशिवाय हा विजय शक्य नव्हता.
-
लोकेश राहुल – भारताचा सलामीवीर केएल राहुलने पहिल्या डावात १२९ धावांचे योगदान दिले. त्यामुळे त्यांना सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. केएल राहुलने २५० चेंडूत १ षटकार आणि १२ चौकारांची खेळी करत १२९ धावा केल्या.
-
जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी : जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या जोडीने नवव्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी उभारली. या जोडीने कपिल देव आण मदनलाल या जोडीच्या ६६ धावांच्या भागीदारीचा विक्रम मोडला. बुमराह आणि शमीने दुसऱ्या डावात १२० चेंडूत ८९ धावांची भागीदारी केली.
-
डाव घोषित झाला तेव्हा मोहम्मद शमीने ६ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ५६ तर जसप्रीत बुमराहने नाबाद ३४ धावा केल्या. त्यामुळे भारताने आपला दुसरा डाव ८ बाद २९८ धावांवर घोषित केला. विशेष म्हणजे दुसऱ्या डावात मोहम्मद शमीने २ तर जसप्रीत बुमराहने ३ बळी घेतले.
-
रोहित शर्मा : दुसऱ्या डावात भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि के. एल. राहुल यांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली. रोहितने १४५ चेंडूत ८३ धावांची खेळी केली. यात १ षटकार आणि ११ चौकारांचा समावेश आहे. यामुळे भारताने पहिल्या डावात ३६४ धावा केल्या.
-
चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे : दुसऱ्या डावात के. एल राहुल, रोहित शर्मा आणि विराट कोहली बाद झाल्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी संघाचा डाव सावरला.
-
पुजारा आणि राहणे यांनी भारतीय संघाला २९७ चेंडूत १०० धावांची भागीदारी केली.
-
मोहम्मद सिराज – मोहम्मद सिराजच्या दमदार गोलंदाजीच्या मदतीने भारताचा विजय आणखी सुखकर झाला. सिराजने दोन्ही डावात ८ बळी घेतले. मोहम्मद सिराजने इंग्लंडचा शेवटचा फलंदाज जेम्स अँडरसनचा त्रिफळा उडवत भारताचा विजय साकारला.
-
सिराजने पहिल्या डावात सिबले, हसीब हमीद, बेअरस्टो आणि रॉबिनसन यांचा बळी घेतला. तर दुसऱ्या डावात जोस बटलर, मोइन अली, सॅम करेन आणि जेम्स अँडरसन या फलंदाजांना माघारी धाडले. (फोटो सौजन्य – BCCI)

Uddhav Thackeray : ‘मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे हे मान्य आहे का?’ उद्धव ठाकरे म्हणाले, “मी…”