-
भारतीय खेळाडूंनी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये एका सुवर्णासह सात पदके जिंकली. ही भारताची आतापर्यंतची ऑलिम्पिकमधील सर्वोत्तम कामगिरी आहे.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या ऑलिम्पिकवीरांशी संवाद साधला.
-
यावेळी त्यांनी सर्व खेळाडूंना प्रोत्साहन आणि प्रेरणा देण्यासाठी काही सल्लेही दिले आणि त्यांच्या अडचणी, त्यांचे अनुभव जाणून घेतले.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खेळाडूंना मोलाचं मार्गदर्शन केलं. (Source: MYAS/Twitter)
-
१६ ऑगस्ट रोजी पंतप्रधानांनी त्यांच्या निवासस्थानी खेळाडूंची भेट घेतली आणि एकत्र नाश्ता केला. या संवादाचं प्रक्षेपण आज करण्यात आलं. त्यावेळी पंतप्रधानांनी खेळाडूंच्या आवडीनिवडी लक्षात ठेवून त्यांची विचारपूस केली, त्यांच्यासोबत थट्टामस्करी केली.
-
नीरज चोप्राने भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकले, जे भारताचे अॅथलेटिक्समधील पहिले पदक ठरले.
-
सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा याचं चुरमाप्रेम लक्षात ठेवत मोदींनी त्याला आणि इतर खेळाडूंनाही चुरम्याचा नाश्ता दिला. यावेळी त्यांनी या चुरमाप्रेमाबद्दलचाच एक किस्साही नीरजला सांगितला.
-
हा चुरम्याचा नाश्ता करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी नीरजला म्हणाले की, हे तुझं चुरमाप्रेम तुला महागात पडेल. त्याचबरोबर त्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचा एक किस्साही नीरजला सांगितला. ते म्हणाले, अटलजी जेव्हा पक्षाचं काम करत होते, तेव्हा ते बरेच बाहेर फिरत होते. त्यामुळे बाहेर खाणंही व्हायचं. एकदा असंच ते एका कुटुंबात जेवण करण्यासाठी गेले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की गुलाबजाम खूपच चांगले होते, मला आवडले. त्यामुळे त्यानंतर ते जिथे कुठे जायचे तिथे सगळीकडे गुलाबजाम असायचे. तेव्हा शेवटी कंटाळून ते म्हणाले की, बाबांनो आता एक सर्क्युलर काढून सांगा की मी जेव्हा कुठे जेवायला जाईन तेव्हा गुलाबजामशिवायही काही खायला द्या. (Source: MYAS/Twitter)
-
मीराबाई चानूने पहिल्याच दिवशी रौप्यपदक जिंकून भारताच्या मोहिमेची सुरुवात केली.
-
दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारी पी. व्ही. सिंधू दुसरी भारतीय आणि पहिली महिला खेळाडू आहे. पी. व्ही. सिंधूने रिओ ऑलिम्पिक २०१६ मध्ये जिंकलेले रौप्यपदकही तिच्यासोबत आणले.
-
पंतप्रधानांनी ४१ वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये भारताला हॉकी पदक मिळवून देणाऱ्या पुरुष हॉकी संघाशीही संवाद साधला. (Source: MYAS/Twitter)
-
सर्व खेळाडूंनी स्वाक्षरी केलेले हॉकी स्टिक्स संघाने पंतप्रधानांना सादर केले.
-
विजेत्यांनी विजय डोक्यात जाऊ देऊ नये आणि पराजितांनी हार मानू नये असा सल्लाही त्यांनी दिला. (Source: MYAS/Twitter)
-
बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेनने कांस्यपदक जिंकले.
-
पंतप्रधानांनी सर्व खेळाडूंची विचारपूस केली. त्यांच्या तब्येतीबद्दल चौकशी केली.
-
त्याचबरोबर त्यांचे ऑलिम्पिक खेळादरम्यानचे अनुभवही जाणून घेतले.
-
काही जणांसोबत त्यांनी थट्टामस्करीसुद्धा केली. यावेळी त्यांनी सर्व खेळाडूंना सांगितलं की, आशा असायला हवी, परिश्रम करायला हवेत, पराक्रमही हवा पण निराशा मात्र कधीच यायला नको.
-
संवाद साधताना पंतप्रधानांनी सर्व खेळाडूंना सांगितलं की, खेळाडूंच्या आयुष्यात हारजित येतंच असते. त्यामुळे विजय डोक्यात जाऊ देऊ नये आणि अपयश, हार कधीच मनात राहू देऊ नये.
-
हा मंत्र आयुष्यात खूप महत्त्वाचा आहे. विजय जर डोक्यात राहिला तरी त्याचा काही उपयोग नाही आणि हार मनात राहिली तरी त्याचा काहीच उपयोग होत नाही.
-
भारतीय महिला हॉकी संघाने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करून प्रथमच ऑलिम्पिक उपांत्य फेरीत प्रवेश केला.
-
देशाच्या हॉकी संघाशी संवाद साधताना हॉकी खेळाडूंनी नरेंद्र मोदींचे आभार मानले.
-
खेळ संपल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या फोनमुळे खेळाडूंचं मनोबल वाढलं असंही या संघाच्या खेळाडूंनी सांगितलं.
-
मोदींनी ऑलिम्पिकमधून दोन पदके घेऊन परतलेल्या कुस्ती संघाशीही संवाद साधला. (Source: Bajrang Punia/Twitter)
-
तुम्ही सर्वांनी मेजर ध्यानचंद यांना खरी श्रद्धांजली वाहिली आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी या खेळाडूंना म्हणाले. (Source: MYAS/Twitter)
-
भारताच्या खेळाडूंनी टोक्योत इतिहास रचला आणि आजपर्यंत सर्वाधिक पदके जिंकली.
-
(सर्व फोटो सौजन्य : पंतप्रधान नरेंद्र मोदी / युट्यूब)

“…तर उद्याच भारताची २५ टक्के टॅरिफमधून सुटका”, डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचं मोठं विधान; घातली ‘ही’ अट!