-
टेबल टेनिसपटू भाविना पटेलने टोक्यो पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत इतिहास घडवत अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला आहे. (फोटो सौजन्य – एएनआय)
-
या स्पर्धेमध्ये तिने उपांत्य फेरीमध्ये चीनच्या झँग मियाओला पराभूत केले आणि दणक्यात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
यामुळे अंतिम फेरीमध्ये पोहचणारी ती पहिली भारतीय टेबल टेनिसपटू ठरली आहे. -
महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भाविनाने सर्बियाच्या बोरिस्लाव्हा पॅरिच रँकोव्हिच हिचा सरळ सेटमध्ये पराभव केला होता.
-
३४ वर्षीय भाविनाने चीनच्या झँग मियाओला ३-२ असं सरळ सेटमध्ये पराभूत केलं.
-
७-११, ११-७, ११-४, ९-११, ११-८ ने भाविनाने उपांत्य सामना जिंकला.
-
आतापर्यंत कोणत्याही भारतीय महिला खेळाडूला पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावता आलेलं नाही. त्यामुळेच भारताची पहिली गोल्डन गर्ल होण्याची संधी भाविनाकडे आहे.
-
२०१६ मध्ये रियो ऑलिम्पिकमध्ये भारताची बॅटमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि पॅराऑलिम्पियन दीपा मलिकने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं होतं.
-
मात्र भाविनाकडे सुवर्ण कामगिरी करुन इतिहास घडवण्याची चांगली संधी आहे.
त्यामुळे टेबल टेनिसमध्ये भाविनाकडून आता सुवर्णपदकाच्या आशा देशाला लागून राहिलेल्या आहेत. -
टेबल टेनिसच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचणारी भाविना ही पहिली भारतीय महिला ठरली असली तरी तिचा इथपर्यंत प्रवास फार खडतर होता.
-
भाविनाचा जन्म ६ नोव्हेंबर १९८६ रोजी गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील वडगर या छोट्याशा गावातील मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.
-
पण भाविना एक वर्षाची तिला पोलिओ झाला. भाविनाचे कुटुंब पाच जणांचे असले तरी त्यात कमवता हात फक्त वडिलांचा होता.
-
त्यामुळे त्यांना मुलीवर उपचार करणे शक्य झाले नाही. त्यामुळे तिला अपंगत्व आले.
-
एका बाजूला गरिबी आणि दुसऱ्या बाजूला पोलिओमुळे आलेले अपंगत्व याच्याशी झुंज देत असतानाही भाविनाने कधीही हार मानली नाही.
यानंतर तिने छंद आणि मनोरंजन म्हणून टेबल टेनिस खेळण्यास सुरुवात केली. -
व्हिलचेअरवर बसून टेबल टेनिस खेळत असतेवेळी तिने त्यातच करिअर करण्याचा निर्णय घेतला.
-
यावेळी तिला तिचे प्रशिक्षक तेजलबेन लाखिया आणि लालन दोषी यांनी प्रोत्साहन दिले.
-
त्यानंतर टेबल टेनिसमध्ये मेहनत घेत असतानाच तिने बंगळूरुमध्ये राष्ट्रीय पॅरा टेबल टेनिस स्पर्धेवेळी तिने तिचे पहिले सुवर्णपदक पटकावले.
-
तिने तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात जॉर्डनपासून केली, मात्र तिला पहिले पदक जिंकण्यास थोडासा उशीर झाला.
-
भाविनाने २०१० च्या कॉमनवेल्थ गेम्समध्येही सहभाग घेतला होता. पण त्यावेळी तिला उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला.
-
त्यानंतर २०११ थायलंड ओपनमधील पॅरा टेबल टेनिस स्पर्धेत तिने रौप्य पदकाची कमाई केली.
-
तर २०१३ मधील आशियाई विभागीय स्पर्धेत तिने प्रथमच रौप्य पदक जिंकले.
-
२०१६ च्या रिओ ऑलिम्पिकसाठीही तिची निवड झाली होती, पण काही कारणामुळे तिला यात सहभागी होता आले नाही.
-
दरम्यान आता टेबल टेनिसपटू भाविना पटेलने टोक्यो पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत इतिहास घडवत अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यामुळे सर्वांचेच लक्ष तिच्याकडे लागले आहे. (सर्व फोटो सौजन्य – ट्वीटर)

६.३० वाजता जेवण, प्रत्येक सोमवारी उपवास अन्…; अक्षय कुमारने सांगितले फिटनेस सिक्रेट; म्हणाला, “रविवारी रात्री जेवल्यानंतर मी थेट…”