-
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने सुवर्णपदकाची कमाई करत इतिहास रचला आहे.
नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर त्याच्यावर कौतुकाचा आणि बक्षिसांचा वर्षाव होत आहे. तर काहींनी नीरजच्या कामगिरीचे कौतुक वेगळ्या पद्धतीने केले आहे, प्रसिद्ध मोझ्यक कलाकार चेतन राऊत याने २१,००० पुश पिन्स च्या माध्यमातून मोझ्यक पोर्ट्रेट तयार केले आहे. त्याची ही कलाकृती twitterच्या माध्यमातून नीरज चोप्रा पर्यंत पोहोचली. -
हे मोझ्यक पोर्ट्रेट सहा रंगाच्या पिन्स वापरून तयार करण्यात आलं. यामध्ये त्रिमितीय चित्राचा आभास होतो.
-
कलाकृती साकारण्यासाठी कलाकार चेतन राऊत सोबत मयूर अंधेर, सिद्धेश रबसे, तनवी गडदे, प्रमिला जंगले या तरुणांनी ही सहभाग घेतला.
मुंबईला येताच नीरज चोप्रा आणि चेतन राऊत यांची भेट झाली. चेतन राऊत याने साकारलेली कलाकृती पाहून नीरज भावुक झाला आणि त्याच्या कलेला दाद दिली. ''यार ये चीझ तो, कितनी मेहनत हे यार, बहुत है, ये बिलकुल युनिक चीझ है सच बता रहा हू'', अशी प्रतिक्रिया नीरजने पोर्ट्रेट पाहून दिली. चेतनने तयार केलले हे पोर्ट्रेट नीरजच्या घरी लावण्यात येणार आहे. स्वत: च्या आईचे साकारलेले पोर्ट्रेट पाहून नीरज खूप आश्चर्यचकित झाला. बालकलाकार आयुष्य कांबळेने साकारलेल्या माननीय मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांचे पोर्ट्रेट पाहून नीरजने आयुषचे कौतुक केले. -
नीरजने स्वत:ची स्वाक्षरी केलेले धन्यवाद पत्र चेननला दिले आहे.
-
नीरजने या दोघांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

HSRP Number Plate News: ‘एचएसआरपी’ पाटीबाबत मोठी घडामोड… मुदतवाढ मिळाल्याने ‘या’ तारखेपर्यंत…