-
भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन याने पत्नी आयेशासोबत घटस्फोट घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघांमधील नात्यात दुरावा आला होता. नऊ वर्षांच्या संसारानंतर शिखर धवन आणि आयेशा यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. शिखर धवनच्या चाहत्यांना या घटस्फोटामुळे आश्चर्य वाटत आहे.
-
ऑक्टोबर २०१२ मध्ये शिखर धवनने आयेशा मुखर्जीसोबत लग्न केलं होतं. आयेशाचं हे दुसरं लग्न होतं. आयेशाला पहिल्या पतीपासून दोन मुली आहेत. शिखर आणि आयेशा यांना एक सात वर्षाचा मुलगा असून त्याचं नाव जोरावर आहे. २०१४ मध्ये जोरावरचा जन्म झाला. मेलबर्नमध्ये राहणारी आयेशा मुखर्जी लग्नाच्या नऊ वर्षांनी शिखर धवनपासून विभक्त होत आहे.
-
भारतीय यष्टीरक्षक दिनेश कार्तिकने १६ वर्षांच्या कारकिर्दीत अनेक सामने खेळले, पण तो भारतीय संघात नीटसा स्थिरावू शकला नाही. कृष्णा कुमार दिनेश कार्तिक असे पूर्ण नाव असलेल्या कार्तिकने २००७ मध्ये चेन्नईत बालमैत्रिण निकीता वंजाराशी विवाह केला. पण २०१२ मध्ये निकीताने दिनेश कार्तिकशी घटस्फोट घेत टीम इंडियाचा फलंदाज मुरली विजयशी विवाह केला.
-
त्यानंतर कार्तिकने भारतीय स्कॉशपटू दिपीका पल्लीकल हिच्याशी २०१५ मध्ये विवाह केला.
-
माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीननेही दोनदा लग्न केले आहे. नौरिन यांच्याशी अझरुद्दीन यांचा १९८७ साली विवाह झाला. हा विवाह ९ वर्ष टिकला.
-
त्यानंतर १९९६ मध्ये अभिनेत्री संगिता बिजलानी सोबत त्यांनी विवाह केला. त्यांना एकूण दोन मुले होती. त्यातील अयावुद्दीनचा अपघातात मृत्यु झाला. दुसरा मुलगा असाऊद्दीन हा क्रिकेटर असून त्याने सानिया मिर्झाची बहिणी अनम मिर्झा हिच्याशी दुसरा विवाह केला आहे.
-
विनोद कांबळीने १९९८ मध्ये पुण्यातील हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्ट असलेल्या नोयला लेविलबरोबर विवाह केला. ती त्याची बालपणीपासूनची मैत्रिण होती. त्यानंतर काही वर्षात हे जोडपे वेगळे झाले.
-
त्यानंतर कांबळीने मॉडेल असलेल्या अँड्रीया हेविटबरोबर विवाह केला. त्यांना २०१० मध्ये मुलगा झाला.
-
जवागल श्रीनाथने १९९९ मध्ये पहिला विवाह केला. तो जोत्सनाबरोबर विवाहबद्ध झाला, परंतु काही वर्षांनी दोघांच्या संमतीने त्यांनी घटस्फोट घेतला. नंतर २००७ मध्ये तो पत्रकार माधवी पत्रावलींबरोबर विवाहबद्ध झाला.
-
युवराज सिंगचे वडिल योगराज सिंग यांनीही दोन वेळा लग्न केले आहे. भारताकडून १ कसोटी व ६ वनडे सामने खेळलेले योगराज यांनी पहिला विवाह शबनम यांच्याशी केला होता. त्यांना जो मुलगा झाला, तोच युवराज सिंग. पण कालांतराने योगराज आणि शबनम यांच्यात भांडणे होऊ लागली, त्यामुळे ते दोघे वेगळे झाले.
-
त्यानंतर योगराज सिंग यांनी सतवीर कौर यांच्याशी विवाह केला. त्यांना दुसऱ्या पत्नीपासून मुलगा विक्टर तर मुलगी अमरजीत कौर अशी दोन मुले आहेत.

६.३० वाजता जेवण, प्रत्येक सोमवारी उपवास अन्…; अक्षय कुमारने सांगितले फिटनेस सिक्रेट; म्हणाला, “रविवारी रात्री जेवल्यानंतर मी थेट…”