भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी लवकरच पुन्हा एकदा टीम इंडियामध्ये दिसणार आहे. पण यावेळी तो टी-२० वर्ल्डकपमध्ये मेंटॉर म्हणून संघाला सपोर्ट करेल. १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा होईल. मात्र, धोनीबाबतही एक वादही निर्माण झाला आहे. तो चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार आहे आणि अशा परिस्थितीत, हितसंबंधांच्या जपणूकीवरून एक तक्रार बीसीसीआयकडे दाखल करण्यात आली आहे. गेल्या वर्षी १५ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला धोनी गेल्या काही दिवसांपासून या कारणामुळे खूप चर्चेत आहे. धोनीच्या चर्चेत येणाऱ्या गोष्टी अनेकांना माहीत असतात, परंतु अशा अनेक छुप्या गोष्टी आहेत, ज्या फक्त त्याच्या मित्रांना ठाऊक आहेत. जेव्हा धोनी मित्रांसोबत डिनरला जातो तेव्हा तो फोन त्याच्यासोबत ठेवत नाही, ही गोष्टदेखील अनेकांना कदाचित माहीत नसेल. त्याच्या एका मित्राचे म्हणणे आहे, की जेव्हा जेव्हा धोनी त्याच्या घरी जेवण करण्यासाठी येतो तेव्हा तो त्याचा फोन हॉटेलमध्येही सोडतो. अडीच-तीन तास तो फोन स्वत:कडे ठेवत नाही. आयपीएलच्या काळातही धोनी हॉटेलमधील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सामन्याची तिकीटे देतो. आयपीएल २०२१ स्पर्धेचा दुसरा टप्पा १९ सप्टेंबरपासून रंगणार आहे. -
टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये जाण्याअगोदर धोनी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करेल.

Ratnagiri Accident : रत्नागिरीच्या कशेडी घाटाजवळ अपघात, मुंबईवरुन निघालेली लक्झरी बस जळून खाक