-
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चे उर्वरित पर्व रविवारपासून सुरु होत असून यासाठी आयपीएलचे चाहते फार उत्सुक आहेत.
-
सलग पाचवेळा ही स्पर्धा जिंकणारा मुंबई इंडियन्सचा संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील पुन्हा आयपीएलसाठी सज्ज झाला आहे.
-
आयपीएलच्या दुसऱ्या भागाची तयारी पूर्ण झाली आहे.
-
दुबई, शारजा आणि आबु धाबीमधील मैदानांवर आयपीएलचे उर्वरित सामने खेळवले जाणार आहे.
-
आयपीएलचे सर्वाधिक पाच वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सने या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर संघाचे नवीन थीम साँग लाँच केले आहे.
-
या थीम साँगमध्ये महाराष्ट्राची संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
-
मुंबई इंडियन्सच्या अधिकृत ट्वीटरवरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
-
“मुंबई इंडियन्स, महाराष्ट्राच्या प्रत्येक फॅमिलीचा अभिमान. चला पलटन, यंदाच्या आयपीएलमध्ये होऊ द्या आपलाच आवाज,” असे मराठीत कॅप्शनही या व्हिडीओला देण्यात आले आहे.
-
या व्हिडीओत कर्णधार रोहित शर्मा, हार्दिक पांड्यासह अनेक खेळाडूंनी फेटा परिधान केला आहे.
-
या व्हिडीओत मुंबई इंडियन्समधील सर्वच खेळाडू मोठ्या जोशात, जल्लोषात नाचताना दिसत आहे.
-
विशेष म्हणजे यात मुंबई इंडियन्स संघाच्या सर्वेसर्वा नीता अंबानीही दिसत आहे.
-
महाराष्ट्राच्या प्रत्येक फॅमिलीचा, अभिमान आहे मुंबई इंडियन्स, असा संदेश नीता अंबानी यांनी मराठीतून दिला आहे.
-
साहस कुणाचं, धाडसं कुणाचं, आपल्या फॅमिलीचा, असे या गाण्याचे बोल आहेत.
आपली पोरं? भारी, आपली टीम? भारी, आपली फॅमिली? लय भारी, आयपीएल येतंय, पलटन! तयार रहा! असे कॅप्शन मुंबई इंडियन्स फेसबुकला दिले आहे. -
सध्या मुंबई इंडियन्सचे हे गाण सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
-
अवघ्या पाच तासांपूर्वी लाँच झालेल्या या गाण्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
-
करोना नियमांचे पालन करुन आणि युएई सरकारने आखून दिलेल्या नियमांनुसार या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे.
-
पहिल्या सत्रामध्ये आयपीएल २०२१ मध्ये २९ सामने खेळवण्यात आले. मात्र खेळाडूंना करोना संसर्ग झाल्याने अनिर्णित काळासाठी आयपीएल स्थगित करण्यात आलं होतं.
-
त्यानंतर आयपीएल युएईमध्ये घेण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने घेतलाय.
-
टी २० विश्वचषक स्पर्धा १९ ऑक्टोबरपासून याच ठिकाणी खेळवली जाणार असल्याने बीसीसीआयने येथेच सामने खेळवण्याचा निर्णय घेतलाय.

भाजपाचा बालेकिल्ल्यातच पराभव, काँग्रेसचा दणदणीत विजय; नगरपालिकेवर कशी मिळवली सत्ता?