-
भारतीय कर्णधार विराट कोहली (२०१२-२०१६) या कालावधीत वर्ल्डकपमध्ये १६ सामने खेळला आहे. त्यात एकूण ७७७ धावा केल्या आहेत. यात ९ अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद ८९ ही सर्वोत्तम खेळी आहे. (Photo- Indian Express)
-
रोहित शर्मा (२००७-२०१६) या कालावधीत आतापर्यंत २८ पैकी २५ सामन्यात खेळला आहे. यात एकूण ६७३ धावा केल्या आहेत. या धावसंख्येत ६ अर्धशतकांचा समावेश आहे. (Source: PTI)
-
युवराज सिंगने (२००७-२०१६) या कालावधीत भारतीय संघात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. २००७ विश्वचषकात ६ चेंडूत ६ षटकार मारल्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. युवराज सिंगने एकूण ५९३ धावा केल्या आहेत. यात ४ अर्धशतकांचा समावेश आहे. (Reuters/File Photo)
-
महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली २००७ मध्ये भारताने विश्वचषक जिंकला होता. आता धोनी भारतीय संघाचा मार्गदर्शक आहे. २००७ ते २०१६ या कालावधीत भारतीय संघासाठी खेळला असून त्याने एकूण ५२९ धावा केल्या आहेत. (Photo- Indian Express)
-
गौतम गंभीर भारतीय संघात २००७ ते २०१२ या कालावधीत झालेल्या वर्ल्डकपमध्ये होता. त्याने एकून ५२४ धावा केल्या असून यात ४ अर्धशतकांचा समावेश आहे. ७५ धावा ही सर्वोत्तम खेळी आहे. (Photo- Indian Express)
-
सुरेश रैना भारतीय वर्ल्डकप संघात २००९ ते २०१६ या कालावधीत होता. त्याने एकूण ४५३ धावा केल्या आहेत. यात एका शतकाचा समावेश आहे. (Source: Reuters)
-
विरेंद्र सेहवाग २००७ ते २०१२ या कालावधीतील वर्ल्डकपमध्ये भारतीय संघात खेळला. त्याने एकूण १८७ धावा केल्या आहेत. यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. (Source: Reuters)
-
युसुफ पठाण भारतीय संघात २००७ ते २०१० या कालावधीत होता. त्याने एकूण १२२ धावा केल्या आहेत. (File Photo/BCCI)
-
रॉबिन उथप्पा २००७ च्या एकमेव वर्ल्डकपमध्ये खेळला. त्यात खेळलेल्या ६ सामन्यात त्याने ११३ धावा केल्या. यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. (Photo- Indian Express)
-
अजिंक्य रहाणे २०१४ ते २०१६ या वर्ल्डकप संघात होता. त्याने एकूण ९४ धावा केल्या आहेत. ४० ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. (Source: AP)

Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live: “मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्यच होऊ शकत नाहीत”, भाजपाच्या मंत्र्याची मोठी प्रतिक्रिया