-
वेस्ट इंडिजचा ख्रिस गेलने सात टी २० विश्वचषकात खेळत सर्वाधिक धावा केल्या आहेत. गेलने आतापर्यंत २८ सामने खेळले असून ९२० धावा केल्या आहेत. तसेच गोलंदाजी करत ९ गडी बाद केले आहेत. (Photo- Reuters)
-
वेस्ट इंडिजचा अष्टपैलू ड्वेन ब्रावो याचही नाव या यादीत आहे. वेस्ट इंडिजने आतापर्यंत दोन विश्वचषक आपल्या नावावर केले आहेत. ड्वेन ब्रावोचा हा शेवटचा वर्ल्डकप असणार आहे. ब्रावोने आतापर्यंत २९ सामने खेळले असून ५०४ धावा केल्या आहेत. तसेच २५ गडी बाद केले आहेत. (Photo- Reuters)
-
बांगलादेशचा ३५ वर्षीय महमुदुल्लाह वर्ल्डकप २०२१ स्पर्धेत बांगलादेशचं नेतृत्व करत आहे. स्कॉटलँडकडून पराभवाचं तोंड पाहूनही जोरदार पुनरागमन करत सुपर १२ मध्ये स्थान मिळवलं आहे. महमुदुल्लाहने आतापर्यंत २५ सामने खेळले असून २८४ धावा केल्या आहेत. तसेच ८ गडी बाद केले आहेत.
-
बांगलादेशचा मुशफिकुर रहीमचा सातवा टी २० वर्ल्डकप आहे. त्याची कामगिरी पाहता त्याला पुन्हा एकदा संघात स्थान मिळालं आहे. रहीमने २८ सामन्यात ३०७ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. (Photo- AP)
-
भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा आतापर्यंतच्या सर्व टी २० वर्ल्डकपमधील भारतीय संघाचा सदस्य राहिला आहे. २००७ मध्ये वर्ल्डकप विजेत्या संघात रोहित शर्मा होता. रोहित शर्माने २००७ पासून आतापर्यंत २८ सामन्यात ३९.५८ सरासरीने ६७३ धावा केल्या आहेत. यात २०१० मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध नाबाद ७९ धावा सर्वोत्तम खेळी आहे. (Photo- PTI)
-
बांगलादेशच्या शाकिब अल हसनचं नावही यात आहे. शाकिबचा हा सलग सातवा वर्ल्डकप आहे. आतापर्यंत २८ सामन्यात बांगलादेशकडून खेळला आहे. त्यात त्याने एकूण ६७५ धावा केल्या आहेत. तसेच ३९ गडी बाद केले आहे. यंदाच्या विश्वचषकात सुपर १२ मध्ये स्थान मिळवण्यात शाकिबब अल हसनचं मोलाचं योगदान आहे. (Photo- Facebook)

“मी प्रत्येक वेळी सावध…”, करिश्मा कपूरने सांगितला गोविंदाबरोबर काम करण्याचा अनुभव; म्हणाली…