-
टी २० वर्ल्डकप (२०१४) स्पर्धेत श्रीलंका विरुद्ध नेदरलँड सामन्यात नेदरलँडने सर्वात कमी धावसंख्या केली होती. १० षटकं आणि ३ चेंडूत नेदरलँडचा संपूर्ण संघ तंबूत परतला होता. तर श्रीलंकेनं हे आव्हान ५ षटकात १ गडी गमवून पूर्ण केलं होतं. (Photo- Neterland Cricket)
-
टी २० वर्ल्डकप (२०२१) स्पर्धेतही नेदरलँडच्या नावावर नकोसा विक्रम आहे. श्रीलंकेविरुद्ध पात्रता फेरीत खेळताना नेदरलँड संघाने १० षटकात सर्वबाद होत ४४ धावा केल्या. श्रीलंकेने हे आव्हान ७ षटकं १ चेंडूत २ गडी गमवून पूर्ण केलं. (Photo- Twitter)
-
गजविजेता वेस्ट इंडिज संघ टी २० (२०२१) वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरूद्ध सुपर १२ फेरीत खेळताना अवघ्या ५५ धावांवर सर्वबाद झाला. इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत वेस्ट इंडिजला फलंदाजीचं आमंत्रण दिलं होतं. वेस्ट इंडिजने १४ षटकं आणि २ चेंडूत सर्वबाद ५५ धावा केल्या. (Photo-T20 World Cup Twitter)
-
टी वर्ल्डकप (२०१४) स्पर्धेत न्यूझीलंड संघाने श्रीलंकेविरूद्ध खेळताना अवघ्या ६० धावा केल्या होत्या. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. श्रीलंकेचा संपूर्ण संघ ११९ धावांवर बाद झाला. तर न्यूझीलंडचा संघ ६० धावाच करू शकला. (Photo- Indian Express)
-
आयर्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज सामना २०१० वर्ल्डकपमध्ये रंगला होता. वेस्ट इंडिजने ९ गडी गमवून १३८ धावा केल्या होत्या. तर आयर्लंडचा संघ सर्वबाद ६८ धावा करू शकला. (Photo- Reuters)
-
भारताने टी २० वर्ल्डकप (२०१६) मध्ये सर्वात कमी धावा केल्याची नोंद आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत २० षटकात ७ गडी गमवून १२६ धावा केल्या होत्या. भारताने १८ षटकं आणि १ चेंडू खेळत सर्वबाद ७९ धावा केल्या होत्या. (Photo-PTI)

भाजपाचा बालेकिल्ल्यातच पराभव, काँग्रेसचा दणदणीत विजय; नगरपालिकेवर कशी मिळवली सत्ता?