-
टी २० वर्ल्डकपमध्ये भारताची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झालेला नाही. सुपर-१२ स्टेजच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने भारताचा दारुण पराभव केला आहे. पाकिस्तानने रविवारी झालेल्या सामन्यात भारताचा दहा गडी राखून पराभव करत इतिहास रचला. (Photos: Reuters/PCB Twitter)
-
पाकिस्तानचे आघाडीचे फलंदाज बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या दोघांनीच संघाला विजय मिळवून दिला.
-
भारताने पाकिस्तानला १५२ धावांचं टार्गेट दिलं होतं. पाकिस्तानही एकही विकेट न गमावता अत्यंत सहजपणे हे आव्हान पूर्ण केलं.
-
बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानच्या जोडीने भारताला पराभवाचं तोंड दाखवलं.
-
भारतीय संघ फलंदाजीत पूर्णपणे अपयशी ठरला. पहिल्या विकेट्स गेल्यानंतर फक्त विराट कोहली आणि पंतने केलेल्या फलंदाजीमुळे भारत १५१ धावांपर्यंत पोहोचू शकला. शेवटला हार्दिक पंड्या आणि जडेजादेखील चांगली फलंदाजी करु शकले नाहीत.
-
पाकिस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने जबरदस्त गोलंदाजी केली. शाहीनने विराट कोहली, रोहित शर्मा आणि के एल राहुलची विकेट घेतली.
-
भारतीय फलंदाजी शाहीन आफ्रीदीसमोर निष्प्रभ ठरताना दिसली. शाहीनने तीन विकेट घेताना १३ डॉट बॉल टाकले.
-
यासोबत वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानने पहिल्यांदाच भारताचा पराभव केला आणि आपल्या नावावर असणारा लाजिरवणा विक्रम मोडला.
-
टी-२० वर्ल्डकपमध्ये दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत सहा सामने झाले आहेत. यामध्ये आता पाकिस्तानने एक जिंकला आहे. पहिल्या पाच सामन्यांमध्ये भारताचा विजय झाला आहे.
-
एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असणाऱ्या दोन्ही संघाचे खेळाडू सामन्यानंतर मात्र एकमेकांसोबत चर्चा करताना दिसून आले. यानंतर सोशल मीडियावर दोन्ही संघाच्या खेळाडूंचं कौतुक होत आहे.
-
सामना संपल्यानंतर विराट कोहलीने दोन्ही फलंदाजांचं अभिनंदन केलं. यावेळी त्याने रिझवानची गळाभेटदेखील घेतली.
-
विराट कोहलीच्या या कृतीने सर्वांचंच मन जिंकलं आहे.
-
पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही विराट कोहलीचं कौतुक करत हा फोटो शेअर केला असून हेच स्पिरीट ऑफ क्रिकेट असल्याचं म्हटलं आहे.
-
सोशल मीडियावर विराट कोहलीचा हा फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये विराट कोहली हसत हसत रिझवानची गळाभेट घेत असल्याचं दिसत आहे.
-
सामना संपल्यानंतर पाकिस्तान संघाचा वरिष्ठ खेळाडू शोएब मलिकने भारतीय संघाचा मेंटॉर धोनीसोबत बातचीत केली. बराच वेळ दोघं एकमेकांशी बोलत होते. आयसीसीने याचा व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमने धोनीची भेट घेत हात मिळवला.

पाकिस्तान नरमला! भारताबरोबर चर्चेची तयारी; भारत मात्र फक्त पाकव्याप्त काश्मीर परत मिळवण्याच्या चर्चेवरच ठाम