-
दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारा स्टार फलंदाज पृथ्वी शॉ त्याच्या दमदार फलंदाजीसाठी ओळखला जातो. चौकार-षटकार मारण्याची त्याची कला सर्वांनाच अवगत आहे. तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. पृथ्वी शॉचे प्राची सिंहसोबत अफेयर असल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या. जाणून घेऊया कोण आहे प्राची सिंह…
-
माध्यमांच्या वृत्तानुसार, प्राची सिंह आणि पृथ्वी शॉ सतत एकमेकांना डेट करत आहेत. दोघांनीही याबाबत उघडपणे काहीही सांगितलेले नाही.
-
प्राची सिंहचा जन्म २२ जुलै १९९५ रोजी मुंबईत झाला. प्राची खूप सुंदर आहे आणि ती सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते.
-
प्राचीने मुंबई विद्यापीठात शिक्षण घेतले आहे. २०१९ मध्ये मनोरंजन क्षेत्रात प्रवेश केला. कलर्स टीव्ही शो ‘उडान’मध्ये प्राचीने वंशिका शर्माची भूमिका साकारली होती.
-
प्राची ही एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच उत्तम नृत्यांगनाही आहे. अनेकदा ती तिच्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
-
‘द कपिल शर्मा शो’मध्ये पृथ्वी शॉने हजेरी लावली होती. यादरम्यान कपिल पृथ्वीला तुझी कोणी गर्लफ्रेंड आहे का? असा प्रश्न विचारतो. यावर पृथ्वी त्याला नाही असे उत्तर देतो. हे उत्तर देताना तो त्याच्या ओठांवर जीभ फिरवतो.

२०२६ मध्ये जगावर मोठं संकट? बाबा वेंगा यांची सर्वात मोठी भविष्यवाणी! जे घडणार ते वाचून थरथर कापाल; जर हे खरं ठरलं तर…