-
आयपीएलचा पंधरावा हंगाम आता शेवटाकडे जात आहे. सध्या कोणकोणते संघ प्लेऑफपर्यंत पोहोचणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
-
याआधीच्या सर्वच हंगामात चेन्नई किंवा मुंबई या दोन्हीपैकी एकतरी संघ प्लेऑफसाठी पात्र ठरलेला आहे.
-
मात्र आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंबई इंडियन्स किंवा चेन्नई सुपर किंग्ज या संघांशिवाय प्लेऑफ सामने खेळवले जातील.
-
लखनऊ सुपर जायंट्स संघाचा १० मे रोजी गुजरात टायटन्सविरोधात खेळताना पराभव झाला. अन्यथा हा संघ प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला असता.
-
लखनऊ संघाचे अजून दोन सामने शिल्लक आहेत. त्यामुळे हे दोन्ही सामने जिंकून २० गुण मिळवण्याची संधी लखनऊकडे आहे. बाकीच्या संघांनी सुमार कामगिरी केल्यास दोन्ही सामने गमावल्यानंतरही लखनऊ संघ प्लेऑफपर्यंत पोहोचू शकतो.
-
राजस्थान आणि बंगळुरु या दोन्ही संघांचे आणखी दोन सामने बाकी आहेत. या दोन्ही संघांनी आपापले दोन्ही सामने जिंकल्यास ते नक्कीच प्लेऑफर्यंत पोहोचतील.
-
तसेच दुसऱ्या संघांचे निकाल बंगळुरु आणि राजस्थानसाठी अनुकूल असल्यास एक सामना जिंकला तरी हे दोन्ही संघ प्लेऑफपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
-
दिल्लीसाठी प्लेऑफर्यंत पोहोचण्याची लढाई थोडी कठीण आहे. राजस्थान आणि बंगळुरु संघाने त्यांचे दोन्ही सामने जिंकले तर दिल्ली संघ उर्वरित दोन्ही सामने जिंकूनही प्लेऑफर्यंत पोहोचू शकणार नाही. त्यामुळे बंगळुरु आणि राजस्थान या दोन संघांच्या कामगिरीवर दिल्लीचे भवितव्य ठरणार आहे.
-
प्लेऑफपर्यंत पोहोचण्यासाठी पंजाब किंग्ज संघाला त्याचे उर्वरित तिन्ही सामने जिंकावे लागतील. तिन्ही सामने जिंकून १६ गुणांवर हा संघ प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहू शकतो. मात्र हे समीकरण सत्यात उतरणार का हे पाहावे लागणार आहे.
-
केकेआर संघाची प्लेऑफर्यंत पोहोचण्याची शक्यात खूपच कमी आहे. कारण राजस्थान किंवा बंगळुरु या संघांनी दोनपैकी एकजरी सामना जिंकला तरी केकेआर प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर फेकला जाईल.

१२ राशींच्या आठवड्याची सुरुवात कशी होणार? कोणाची चिडचिड कमी तर कोणाची कामे सुरळीत पार पडणार; वाचा राशिभविष्य