-
Vivo ने आपला फोल्डेबल स्मार्टफोन Vivo X Fold लाँच केला आहे. कंपनीचा हा फोन Samsung Galaxy Z Fold 3 5G सारखा आहे. यात मागे चार कॅमेरे, 4600mAh बॅटरी आणि 60x डिजिटल झूम सारखी वैशिष्ट्ये दिली आहेत. यासोबतच Vivo ने Vivo X Note प्रीमियम स्मार्टफोन आणि Vivo Pad टॅबलेट देखील लाँच केला आहे. (Photo-Vivo)
-
कंपनीच्या या पहिल्या फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये १२० एचझेड रिफ्रेश रेटसह ८.०३ इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. डिस्प्ले २के रिझोल्युशनचा आहे. यात दुसरा डिस्प्ले देखील आहे, जो ६.५३ इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८ जन १ प्रोसेसर देण्यात आला आहे. (Image credit: Abhishek Yadav/Twitter)
-
याला क्वाड-रीअर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये ५० एमपी प्राथमिक सेन्सर, ४८ एमपी अल्ट्रा-वाइड, १२ एमपी पोर्ट्रेट कॅमेरा आणि ८ एमपी पेरिस्कोप कॅमेऱ्यांचा समावेश आहे. हा कॅमेरा ५ एक्स ऑप्टिकल झूम आणि ६० एक्स डिजिटल झूमला सपोर्ट करतो. डिव्हाइसमध्ये ३२ एमपी सेल्फी कॅमेरा देखील आहे. त्याची बॅटरी ४६०० एमएएच आहे. ६६ वॅट वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. (Photo-Vivo)
-
Vivo X Note स्मार्टफोनमध्ये १२० एचझेड रिफ्रेश रेटसह ७ -इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे, जो २ के रिझोल्यूशनला सपोर्ट करतो. स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८ जन १ प्रोसेसर आणि ५००० एमएएच बॅटरी आहे. हे ८० वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोन क्वाड रियर कॅमेरा सेटअप पॅक करतो, ज्यामध्ये ५० एमपी प्राथमिक कॅमेरा, ४८ एमपी अल्ट्रावाइड कॅमेरा, २ एक्स झूमसह १२ एमपी पोर्ट्रेट कॅमेरा आणि ५ एक्स झूम सपोर्टसह ८ एमपी पेरिस्कोप कॅमेरा समाविष्ट आहे. (Photo-Vivo)
-
कंपनीने सध्या ही उपकरणं फोन चीनमध्ये लाँच केली आहेत. Vivo X Fold दोन स्टोरेजमध्ये येतो. त्याच्या १२ जीबी + २५६ जीबी मॉडेलची किंमत CNY ८,९९९ (अंदाजे रु. १,०७,२००) आणि १२ जीबी + ५१२ जीबी व्हेरिएंटची किंमत CNY ९,९९९ (अंदाजे रु १,१९,१००) आहे. (Photo-Vivo)
-
त्याचप्रमाणे Vivo X Note तीन स्टोरेज पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे. त्याच्या ८जीबी + २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत CNY ५,९९९ (अंदाजे रु. ७१,४००), १२ जीबी + २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत CNY ६,४९९ (अंदाजे रु. ७७,४००) आणि १२ जीबी + ५१२ जीबीची किंमत CNY ६४९९ (अंदाजे रु. ८३,३००) आहे. (Photo-Vivo)

Miss England : “मला वेश्या असल्यासारखं वाटलं”, मिस इंग्लंड मिल्ला मॅगीने भारतातील स्पर्धा सोडत केले गंभीर आरोप