-
अॅपलने बुधवारी त्यांच्या फार आउट इव्हेंटमध्ये नवीन आयफोन १४ सीरीजची घोषणा केली. नवीन आयफोन मॉडेल त्यांच्या मागील मॉडेल्सपेक्षा जास्त महाग नाहीत, हे जागतिक आर्थिक मंदी लक्षात घेता दिलासा देणारे आहे.
-
दरम्यान, जे लोक आयफोन १३ खरेदी करण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होते त्यांच्यासाठी अॅपलने किंमती कमी करण्याची घोषणा केली आहे.
-
भारतातील एक वर्ष जुन्या आयफोन १३ ची किंमत अधिकृतपणे कमी करण्यात आली आहे, जी लॉंचच्या किंमतीपेक्षा दहा हजार रुपयांनी कमी आहे.
-
अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवरील सणासुदीच्या विक्रीदरम्यान आयफोन १३ वर चांगली सूट दिली जात आहे, यामुळे ग्राहकांना मूळ किमतीपेक्षा १५,००० रुपयांनी कमी किंमतीत डिव्हाइस मिळू शकते.
-
दरम्यान, कंपनी भारतातील त्यांच्या ऑनलाइन स्टोअरवर ७९,९०० रुपयांच्या लॉंच किमतीवर आयफोन १३ विकत होते.
-
आता अॅपल स्टोरवर अधिकृत सवलत दाखवण्यात आली आहे. याचा अर्थ तुम्ही अॅपल स्टोरला प्राधान्य दिल्यास तुम्हाला आयफोन १३ वर दहा हजार रुपयांची सवलत मिळेल.
-
आता आयफोन १३ची किंमत ६९,९०० रुपयांपासून सुरू होते, तर आयफोन १३ मिनी आता ६४,९०० रुपयांना मिळेल.
-
आयफोन १३ मिनी १२८जीबी – ६४,९०० रुपये.
-
आयफोन १३ मिनी २५६जीबी – ७४,९०० रुपये.
-
आयफोन १३ मिनी ५१२जीबी – ९४,९०० रुपये.
-
आयफोन १३, १२८जीबी – ६९,९०० रुपये.
-
आयफोन १३, २५६जीबी – ७९,९०० रुपये.
-
आयफोन १३, ५१२जीबी – ९९,९०० रुपये.
-
अॅपलने भारतात आयफोन १२ च्या किमतीतही कपात केली आहे. आयफोन १२ ची किंमत आता ५९,९०० रुपयांपासून सुरू होते, तर आयफोन १२ मिनी बंद करण्यात आला आहे.
-
आयफोन १२ मिनीची पूर्वीची किंमत ६४,९०० रुपये होती तर आयफोन १२ ची किंमत ६९,९०० रुपये होती. आयफोन १२ दोन वर्षांपूर्वी आयफोन १४च्या किमतीत लॉंच करण्यात आला होता. (सर्व फोटो : Apple)

काय नाचली राव ही…! भरपावसात ‘वादळ वारा सुटला गं’ गाण्यावर तरूणीने केला डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक