भारतीय बाजारपेठेमध्ये शिओमीला जोरदार मागणी असून आपल्या वैशिष्ट्यपूर्ण डिजाईन आणि अद्ययावत तंत्रज्ञानासाठी हा फोन ओळखला जातो. रेडमी नोट ४ ला या क्षेत्रातील समीक्षकांनी पसंती दिली आहे. अनेक दिवसानंतर अत्यंत भरवशाचा आणि अद्ययावत फोन बाजारात आल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. हा फोन ३ व्हॅरियंट्समध्ये उपलब्ध झाला आहे. २ जीबी, ३ जीबी आणि ४ जीबी या व्हॅरियंट्समध्ये हा फोन उपलब्ध आहे. २ जीबी रॅम (३२ जीबी इंटरनल मेमरी) ची किंमत ९,९९९ रुपये, ३ जीबी रॅम (३२ जीबी इंटरनल मेमरी)ची किंमत १०,९९९ रुपये आणि ४ जीबी रॅम (६४ जीबी इंटरनल मेमरी) ची किंमत १२,९९९ रुपये आहे. शिओमी रेडमी नोटला फिंगरप्रिंट स्कॅनर आणि इन्फ्रारेड सेन्सरदेखील आहे. जीपीआरएस, ब्लूटूथ आणि ३जी, ४ जी ही कनेक्टिविटीची साधने या फोनवर उपलब्ध आहेत. शिओमी रेडमीला १३ मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. ४,१०० एमएएच बॅटरी आहे. अॅंड्रॉइड मार्शमेलो या ऑपरेटिंग सिस्टमवर हा फोन चालतो.

३६ व्या मजल्यावर नवीन घर! ‘ठरलं तर मग’ फेम अर्जुनची ‘ती’ इच्छा बाप्पाने पूर्ण केली; पत्नी श्रद्धा म्हणाली, “आम्ही दोघांनी…”