-
भाऊचा धक्का ते मांडवादरम्यानची वाहतूक सुकर; पहिली बोट आज मुंबई बंदरात.
-
दोन वर्षांपासून प्रतीक्षा असलेली भाऊचा धक्का ते मांडवादरम्यानची प्रवासी तसेच वाहनांची वाहतूक करणारी पहिली रो रो सेवा महिनाभरात सुरू होणार आहे.
-
मुंबई-अलिबाग रस्ता मार्गावरील वाहतूक कोंडीवर उपाय ठरणारी ही सेवा गेल्या दोन वर्षांपासून प्रतीक्षेत आहे.
-
भारतमाला प्रकल्पांतर्गत मुंबईला जोडणाऱ्या मार्गावर ‘रोल ऑन रोल ऑफ’ (रो रो) जल वाहतुकीची सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
-
ग्रीसमधील ‘एस्कायर शिपिंग’ कंपनीने प्रोटोपोरोस या बोटीची बांधणी केली आहे.
-
भाऊचा धक्का येथे सुसज्ज असे रो पॅक्स टर्मिनल बांधून तयार असल्याचे मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
-
महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार १० मार्चच्या आत ही सेवा सुरू केली जाईल.
-
या रो रो बोटची १५० वाहने आणि ८०० प्रवासी वाहून नेण्याची क्षमता आहे.
-
पूर्ण क्षमतेने वाहने आणि प्रवासी नेण्याची परवानगी मिळणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. उपलब्ध क्षमतेपेक्षा कमी प्रमाणातच वाहतुकीची परवानगी मिळण्याची शक्यता आहे.
-
मुंबईत भाऊचा धक्का आणि मांडवा येथे दोन्ही बाजूस टर्मिनल तयार करण्यात आले आहे. मात्र सध्या मांडवा येथील बंदरात गाळाची समस्या मोठी असून, गाळ उपसण्याचे काम जोमाने सुरू आहे.

“मी प्रत्येक वेळी सावध…”, करिश्मा कपूरने सांगितला गोविंदाबरोबर काम करण्याचा अनुभव; म्हणाली…