बारावीमध्ये नापास झाल्यानंतरही न खचता मनोज कुमार यांनी संघर्षावर मात करत महाराष्ट्र कॅडरमध्ये आयपीएस झाले. आजच्या सक्सेस स्टोरीमध्ये आपण मनोज कुमार यांच्या संघर्षाची स्टोरी पाहणार आहोत. -
(संग्रहित छायाचित्र )
मनोज कुमार शर्मा यांनी अनेक अडचणीवर न डगमगता मात केली. वेळप्रसंगी श्रीमंताच्या घरातील श्वानांनाही फिरवलं आणि टॅम्पोवर वाहकाचं कामही केलं. पण जिद्द सोडली नाही. मनोज कुमार २००५ च्या महाराष्ट्र कॅडर बॅचचे आपीएस आधिकारी आहेत. मध्यप्रदेशमधील मुरैना येथे सर्वसामान्य घरात मनोज कुमार यांचा जन्म झाला होता. बारावीपर्यंत त्यांचं शिक्षण सर्वसामान्य विद्यार्थांसारखंचं होते. अकरावीमध्ये मनोजकुमार क श्रेणीतून परिक्षा पास झाले होते. तर बारावीमध्ये नापासही झाले होते. त्यावेळी एक ढ विद्यार्थी म्हणून मनोज कुमार यांच्याकडे सर्वजण पाहत होते. एका मुलाखतीत मनोज कुमार सांगतात की, १२ वीमध्ये मी अतिशय ढ होते. नकल करून बारावीची परिक्षा पास व्हायची आणि कुठेतरी कामाला लागयचा असा प्लॅन ठरवला होता. पण शाळेत परिक्षादरम्यान कॉपी करता आली नाही आणि बारावीमध्ये नापास झालो. त्यावेळी मनोजला वाटले की सर्वात पॉवरफुल व्हायचे. १२ वीमध्ये नापास झाल्यानंतर मनोज कुमार आपल्या भावासोबत टॅम्पो चालवत होते. वेळप्रसंगी त्यांनी वाहकाचं कामही केलं. एकदा टॅम्पो पोलिसांनी पकडल्यानंतर सोडण्यासाठी मनोज कुमार गेला होता.त्यावेळी पोलिसांचा रूबाब पाहून मनोज कुमार यांना आयपीएस होण्याचा विचार डोक्यात आला. त्यावेळी त्यांचा प्रवास सुरू झाला. घरी माघारी आल्यानंतर खाण्यासाठी दररोजची मरमर होती. कुटुंबाचा असातसा उदरनिर्वाह होत होता. परिस्थितीवर मात करण्यासाठी मनोज कुमार यांनी एका ठिकाणी शिपायाची नोकरी केली. या सर्व घडामोडी सुरू असताना मनोज कुमार यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली होती. थोडीफार तयारी झाल्यानंतर पुढील टप्यासाठी मनोज कुमार यांनी राजधानी दिल्ली गाठली. राजधानी दिल्लीमध्ये आल्यानंतर खाण्यासाठीही पैसे नव्हते. उदरनिर्वाहासाठी पैसे नसल्यामुळे श्रीमंताच्या घरांतील श्वानांना सांभाळणं सुरू केलं. ४०० रूपये प्रति श्वानाला पैसे मनोज कुमार यांना मिळत होते. त्या पैशांवर त्यांच्या दिल्लीमधील गरजा भागत होत्या. विकास दिव्यकीर्ती नावाच्या एका शिक्षकाने मनोज कुमारला कोणत्या शुल्काशिवाय आपल्या वर्गात प्रवेश दिला. मनोजनेही त्यांचा विश्वास सार्थ ठरवत पहिल्याच प्रयत्नात पूर्व परिक्षा पास केली. पहिल्या प्रयत्नात पूर्वी परिक्षा पास झाल्यानंतर मनोज कुमार यांचा आत्मविश्वास चांगलाच बळावला. पण १२ वी नापास हा शिक्का त्यांची पाठ सोडत नव्हता. त्यांच्या मनात सतत तोच विचार येत होता. मनोज कुमार एका मुलीवर अतोनात प्रेम करत होते. मात्र, बारावी नापास असल्यामुळे मुलगी नाही म्हणेल म्हणून सांगायची हिम्मंत होत नव्हती. पण तिसऱ्या चौथ्या प्रयत्नात मनोजनं आपल्या दिलाची बात मुलीपर्यंत पोहचवली. मुलीनंही क्षणांचा विचार न करता होकार दिला. मुलीनं प्रेमाला होकार दिल्यानंतर मनोजच्या अंगात दहा हत्तीचं बळ आलं होते. त्यानं आपली तयारी आणखी जोरात सुरु केली. अखेर २००५ च्या महाराष्ट्र कॅडर बॅचमधून मनोज कुमार आयपीएस झाले. मनोज कुमार सध्या मुंबई पोलिसांत अतिरिक्त पोलिस आयुक्त पदांवर कार्यरत आहेत. (फोटो – जितेंद्र चौधरी, सेंट्रेल बँक ऑफ इंडिया यांच्या फेसबुक पेजवरुन घेतले आहेत..)

Lawrence Bishnoi Gang : लॉरेन्स बिश्नोई टोळीला दहशतवादी संघटना म्हणून केलं घोषित, ‘या’ देशाचा मोठा निर्णय