-
सातपाटीच्या बंदरात गेल्या चार दिवसांपासून येऊन ठेपलेल्या सुमारे ४० टन माशांच्या विक्रीबाबत प्रश्न निर्माण झाला होता.
-
१२-१५ दिवस मासेमारी करण्यासाठी खोल समुद्रात गेलेल्या सुमारे ६० ते ७० बोटी २४ व २५ मार्च रोजी सातपाटी बंदरामध्ये दाखल झाल्या होत्या.
-
पण, शासनाने वाहतुकीवर तसेच बाजारांमध्ये खुल्या विक्रीवर निर्बंध आणल्याने या माशांच्या विक्रीबाबत तसेच त्यांची अन्य ठिकाणी वाहतूक करण्याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले होते.
-
या माशांमध्ये पापलेटसह काटी, सुरमई मुशी या निर्यात करण्याच्या दर्जाचे मासे होते.
-
माशांच्या विक्रीसाठी संकट असल्याचं पाहून अनेक मच्छीमार चिंतेत होते.
-
सध्या सातपाटी येथील मच्छीमारांमार्फत मासेमारी केल्यानंतर मासे सहकारी सोसायटीमध्ये गोळा केले जातात. नंतर हे मासे पोरबंदर मार्ग निर्यात केले जातात. मात्र राज्यातील सीमा वाहतुकीसाठी बंद केल्याने निर्यातदार आपली वाहने सातपाटी येथे पाठवण्यास तयार नव्हते.
-
पण, नंतर विविध मच्छीमार संघटनांनी मत्स्यव्यवसाय मंत्री व पालघर जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली.
-
त्यानंतर राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाने गुजरातमधील तसेच राज्यातील संबंधित विभागांशी समन्वय साधून या माशांच्या वाहतुकीचा मार्ग मोकळा केला.
-
पालघरचे जिल्हाधिकारी, पोलिसांनी निर्यातदारांच्या वाहनांसाठी वाहतूक सोयीची होईल याची काळजी घेतली.
-
त्यामुळे मच्छीमारांसमोर आलेले संकट टळल्याने मच्छीमारांनी मत्स्यव्यवसाय मंत्री व पालघर जिल्हाधिकारी यांचे आभार मानले आहेत.

Dussehra Wishes 2025: दसऱ्याला प्रियजनांना पाठवा मराठी शुभेच्छा! WhatsApp, Instagram, Facebook वर शेअर करा PHOTOS