-
देशात करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सर्वत्र लॉकडाउन करण्यात आला आहे. संचारबंदी लागू आहे. यामुळे बेघर, निराश्रितांवर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र शासनाच्या शिवभोजन थाळी योजनेअंतर्गत या लोकांना पोटभर जेवण मिळत आहे. (सर्व छायाचित्र : पवन खेंगरे)
-
राज्य शासनाच्या आदेशानुसार कंत्राटदार गरजूंना शिवभोजन केंद्रात येण्याची वाट न पाहता गरीब नागरिकांच्या वसाहतींमध्ये तसेच झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन शिवभोजन थाळीचे वाटप करत आहेत.
-
भोजन थाळी मोफत मिळत असल्याने पुण्यातील राजीव गांधी नगर येथे गरजू नागरिकांनी गर्दी केली होती.
-
सध्याच्या कठीण परिस्थितीत अल्प मिळकत असलेल्यांसाठी ही शिवभोजन थाळी उपयोगी ठरत आहे.
-
शिवभोजन थाळीचे स्वरुप आता बदलले असून पॅक्ड फूड अर्थात बंद डब्यामधून हे जेवण दिलं जातंय.
-
लॉकडाउनमुळे रोजंदारी कामगारांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
-
अशा वेळी शिवभोजन थाळी गरजूंसाठी वरदान ठरतेय.

बाबा वेंगांची सर्वात मोठी भविष्यवाणी; डिसेंबर २०२५ पर्यंत ‘या’ ३ राशींचे लोक होणार गडगंज श्रीमंत? होणार अचानक धनलाभ!