-
करोनाचा संसर्गाला आळा घालण्यासाठी संपूर्ण जग झटत आहे. भारतातही दिवसरात्र युद्धपातळी करोनाविरोधात उपाययोजना सुरू आहेत. करोनाग्रस्त आणि संशयितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यानं त्यांच्या उपचारांसाठी योजना हाती घेण्यात आली आहे. (सर्व छायाचित्रे – अरुल होरायझन)
-
सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांसाठी सर्वच स्तरातून मदतीचे हात पुढे येत आहे. यात ठप्प झालेली भारतीय रेल्वेही धावून आली आहे.
-
करोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जवळपास ५० रेल्वे कोचचे आयसोलेशन वार्डात रुपांतर करण्याचे काम गोरपूरी येथील कोच दुरुस्ती कारखान्यात सुरू आहे.
-
करोनाला वेळीच आळा घालता यावा आणि करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर वेळीच उपचार करता यावे यासाठी रेल्वेनं जुन्या बोगीमध्ये क्वारंटाइन आणि आयसोलेशन कक्ष तयार केले आहेत.
-
भारतीय वाहतुकीचा कणा असलेल्या रेल्वेनं करोनामुळे उद्भवलेल्या संकटाच्या काळात महत्त्वाचं काम करून दाखवलं आहे.

बाबा वेंगांची सर्वात मोठी भविष्यवाणी; डिसेंबर २०२५ पर्यंत ‘या’ ३ राशींचे लोक होणार गडगंज श्रीमंत? होणार अचानक धनलाभ!