-
हनुमान जयंती निमित्त ठाण्यातील टेंभी नाक्यावरील हनुमान मंदिराबाहेर सोशल डिस्टंसिंगचे भान ठेवून भाविकांनी आरती केली. (सर्व छायाचित्रे – दीपक जोशी)
-
यावेळी नागरिकांनी चेहऱ्यावर रुमाल बांधून योग्य ती दक्षता घेतल्याचे दिसून आले. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य भरातील धार्मिक स्थळांवरील गर्दी टाळण्यासाठी मंदिरांसह सर्व धार्मिक ठिकाण काही काळासाठी बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
-
हनुमान जयंती निमित्त आज राज्यभरात अनेक ठिकाणी पहाटे जन्मोत्सव साजरा करण्यात आला. सध्या करोनामुळे सर्वांच्याच चिंतेत भर पडली असून इच्छा असूनही मंदिरात जाता येत नसल्याचे नागरिकांमधून सांगितले जात आहे.
-
ठाण्यातील जांभळी नाक्यावरील ४३९ वर्षे जुन्या "पेढ्या मारुती" मंदिरात हनुमान जयंती निमित्त दर्शन घेताना भाविक .
-
भाविकांनी सुरक्षित अंतर ठेवून रांग लावून दर्शन घेतले. प्रत्येकाच्या तोंडावर मास्क बांधलेले होते.
-
भाविकांच्याबरोब कर्तव्यावर तैनात असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील हनुमंताचे दर्शन घेतले
-
हनुमान जयंतीनिमित्त भाविकांनी हनुमानाचे दर्शन घेत करोनारुपी संकटातून देशाची मुक्तता कर अशीच प्रार्थना केली असणार.

नवरात्रीचा उपवास कधी सोडावा? नेमकी तारीख, शुभ वेळ आणि पद्धत जाणून घ्या…