-
मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रुग्णालयातील परिचारिकांसह ५० आरोग्य कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचे सोमवारी निदर्शनास आले. ( सर्व फोटो सौजन्य : गणेश शिर्सेकर )
-
प्रतिबंधित विभाग म्हणून जाहीर केलेल्या या रुग्णालयाच्या चौकशीसाठी पालिकेने समिती नियुक्त केली आहे.
-
मुंबईत साठहून अधिक रुग्ण जी दक्षिण विभागात आढळले असून त्या खालोखाल अधिक रुग्ण आता वोक्हार्ट रुग्णालयात नोंदवले गेले आहेत.
-
वोक्हार्ट रुग्णालयात कस्तुरबा रुग्णालयातून २ संशयित आणि २ करोनाबाधिता रुग्ण दाखल झाले होते.
-
बाधित रुग्णांना विलगीकरण कक्षामध्ये ठेवले असले तरी रुग्णालयाने संशयित रुग्णांना मात्र इतर रुग्णांसोबत अतिदक्षता विभागात ठेवले.
-
काही दिवसांतच या रुग्णांनाही करोनाची लागण झाल्याचे निदान झाले. परंतु तोपर्यंत अतिदक्षता विभागात काम करणारे अनेक कर्मचारी रुग्णांच्या संपर्कात आले होते.
-
मुंबईतील वोक्हार्ट रुग्णालय प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे.

Dussehra Wishes 2025: दसऱ्याला प्रियजनांना पाठवा मराठी शुभेच्छा! WhatsApp, Instagram, Facebook वर शेअर करा PHOTOS