-
करोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता पुण्यात जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या अमलबजावणीला सुरुवात झाली आहे. पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात १० दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला असून मंगळवारी १४ जुलैच्या मध्यरात्री सुरु झालेला लॉकडाउन २३ जुलैपर्यंत कायम असणार आहे. (सर्व फोटो – सागर कासार)
-
लॉकडाउनच्या नियमांच पालन व्हावं यासाठी मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.
-
अत्यावश्यक सेवा, कामगार वगळता इतरांना घराबाहेर पडण्यास मनाई आहे. ठिकाण -स्वारगेट
-
स्वारगेट येथे पोलीस वाहनांची तपासणी करताना
-
स्वारगेट येथील पोलीस अधिकारी पूर्वकाळजी म्हणून तपासणी करुन घेताना
-
सार्वजनिक व खासगी प्रवासी वाहने- दोन चाकी, तीन चाकी व चार चाकी संपूर्पत: बंद राहतील. अत्यावश्यक सेवेतील वाहने, पूर्व परवानगी प्राप्त वाहने तसंच विमानतळ, रेल्वे स्टेशन येथे जाणे-येणे करिता व वैद्यकीय कारणास्तव प्रवासासाठी खासगी वाहनांचा वापर अनिवार्य राहील. ठिकाण – अलका चौक
-
अलका चौकात पोलीस कर्मचारी दुचाकी चालकाची चौकशी करताना
-
शहरातील सार्वजनिक व खासगी बस सेवा, ट्रक, टेम्पो, ट्रेलर, ट्रॅक्टर, इत्यादीसाठी संपूर्णत बंद राहील. ठिकाण – हडपसर रामटेकडी
-
हडपसर रामटेकडी येथील चित्र
-
लॉकडाउनमुळे पुण्यातील रस्त्यांवर शुकशुकाट पसरला आहे. लक्ष्मी रोडवरील हे चित्र
-
जंगली महाराज रोडवर शुकशुकाट
-
अत्यावश्यक सेवा, कामगार वगळता इतरांना घराबाहेर पडण्यास मनाई आहे. ठिकाण – लक्ष्मी रोड
-
लॉकडाउनदरम्यान १४ ते १८ जुलैपर्यंत सर्व किराणा दुकानं पूर्णपणे बंद राहणार आहेत. तर दुसरीकडे १९ ते २३ जुलैपर्यंत सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेची दुकानं सुरु राहणार आहेत. ठिकाण – लक्ष्मी रोड

पोटातली सगळी घाण एका दिवसात बाहेर पडेल; खराब कोलेस्ट्रॉलही नसांमध्ये चिकटणार नाही, आठवड्यातून एकदा फक्त “ही” ४ फळं खा