-
राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाल्यापासून मुंबई आणि किनारपट्टी लगतच्या भागांत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. (सर्व छायाचित्र – गणेश शिर्सेकर)
-
बुधवारी दिवसभर आणि गुरुवारी झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचलं होतं.
-
दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीलगत सध्या कमी दाबाचा पट्टा असल्याने राज्यात पावसासाठी पुन्हा अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे.
-
१५ ते १७ जुलै या कालावधीत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होणार असल्याचे अगोदरच सांगण्यात आले होते, काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशाराही हवामान विभागाने दिलेला आहे.
-
१७ जुलै म्हणजे गुरुवारनंतर पावसाचा जोर कमी होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय.
-
मुंबई सीएसएमटी परिसरात संध्याकाळी पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती
-
सध्या लॉकडाउनमुळे रस्त्यांवर वर्दळ कमी असली तरीही पाऊस आला की लोकांची तारांबळ उडतेच. पावसात आडोसा शोधण्याचा प्रयत्न करणारा एक दिव्यांग मुंबईकर…
-
घरात सामान घेऊन जाताना मध्येच पाऊस आला की गाडीवर सामान आणि बाबांना पावसापासून वाचवण्यासाठी मुलगी पुरेपूर प्रयत्न करते.
-
ज्यांच्याजवळ छत्री नसते ती लोकं हातातल्या पिशवीचा आधार घेत पावसापासून वाचण्याचा प्रयत्न करतात.
-
पावसात वाट काढत गाडी चालवणारा दुचाकीस्वार
-
एरवी गर्दीने फुलून गेलेले रस्ते सध्याच्या लॉकडाउन काळात असे दिसतायत.
-
अत्यावश्यक सेवेत काम करणारे कर्मचारी घरी जाण्यासाठी बसची वाट पाहत असताना…
-
या कर्मचाऱ्यांसाठी बेस्ट आणि लोकल सेवा सुरु करण्यात आली आहे.

Trump Tariffs: ट्रम्प यांच्या राजकीय दबावाला मोदी सरकार ‘असं’ देणार उत्तर; घेतले तीन महत्त्वाचे निर्णय