IPS Soumya Sambasivan : दबंग महिला पोलीस आधिकाऱ्यांबाबत विषय निघाल्यास शिमलाच्या पहिल्या महिला एसपी सौम्या सांबशिवन यांचं नाव घेतलं जातेच. IPS सौम्याने आपल्या वर्दीची ताकद दाखवत हिमाचल प्रदेशमधील ड्रग्ज आणि मानव तस्करी करणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवला आहे. कधीकाळी एमबीए करुन आरामात बँकात नोकरी करणाऱ्या सौम्या सांबशिवन आज गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ आहेत. मूळची केरळमधील असणारी सौम्या हिमाचल प्रदेश २०१० कैडर बॅचची आयपीएस आधिकारी आहे. -
सौम्याचे वडील इंजिनिअर होते. सौम्या आई-बाबांची एकुलती एक मुलगी आहे. सौम्याला लेखिका व्हायचा होतं.
बायो स्ट्रीममधून पदवी घेतल्यानंतर सौम्याने एमबीए पूर्ण केलं त्यानंतर बँकेत दोन वर्ष नोकरीही केली. बँकेत नोकरी करताना यूपीएससीची तयारी केली. २०१० मध्ये सौम्या आयपीएस आधीकारी झाली. एसपी म्हणून त्यांची पहिली पोस्टींग हिमाचल प्रदेशमध्ये सिरमौर जिल्ह्यात झाली. सिरमौरमध्ये सौप्यानं ड्रग्ज आणि मानव तस्करी करणाऱ्यांना धडा शिकवला. येथील गुन्हागार सौम्याचं नाव जरी ऐकली तरी घाबरतात. सिरमौर येथे एसपी म्हणून कार्यरत असताना एकदा प्रदर्शनादरम्यान सौम्या यांनी आमदाराच्या कानाखाली लगावली होती. त्या आमदाराला त्यांनी तुरुंगातही पाठवले होते. या प्रकरणानंतर सौम्याचं नाव देशभर गाजलं होतं. -
२०१७ मध्ये सौम्या यांना शिमल्यात एसपी म्हणून पाठवण्यात आलं आहे. शिमल्यात सौम्या यांनी गुन्हेगारांना चांगलाच धडा शिकवला.
-
सौम्या मध्य प्रदेशमधील मुलींना स्पे तायर करण्याचं खास प्रकारचं ट्रेनिंग देत आहे. या स्प्रे केअसरमुळे मुलींना सुरक्षित फील होतं.

अमाप संपत्ती अन् नफा मिळणार! शुक्र-शनीचा नवपंचम योग या ५ राशींसाठी आहे वरदान! अचानक नशीब बदलणार