-
पुणे शहरात दहा दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आलेला आहे. दरम्यान, आज सहाव्या दिवशी अत्यावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी लॉकडाउन शिथील करण्यात आल्याने नागरिक मोठ्याप्रमाणावर घराबाहेर पडले होते. (सर्व फोटो – सागर कासार)
-
पुणेकरांनी भाजी मंडईत मोठ्याप्रमाणावर गर्दी केल्याचे दिसून आले.
-
अनेकांनी पुढील आठवडाभराचा भाजीपाला विकत घेतला.
-
मागील पाच दिवसांपासून नागरिकांना घराबाहेर पडणं शक्य होत नव्हत.
-
भाजी मंडईत नागरिकांची गर्दी झाल्याने या ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाल्याचेही दिसून आले.
-
आज आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस त्यात रविवार असल्याने अनेक नागरिकांनी मटण-चिकन खरेदीसाठी देखील गर्दी केली होती.
-
शहरातील मटण -चिकनच्या दुकानासमोर लांब रांगा लागल्या होत्या.
-
आज लॉकडाउनच्या सहाव्या दिवशी सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तु खरेदीची दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

भाजपाचा बालेकिल्ल्यातच पराभव, काँग्रेसचा दणदणीत विजय; नगरपालिकेवर कशी मिळवली सत्ता?