-
रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना हे सध्या अटकेत आहेत. वास्तूविषारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. सध्या ते तळोजा कारागृहात आहेत. (छायाचित्र/इंडियन एक्स्प्रेस)
-
अर्णब यांच्यासह फिरोज शेख आणि नितेश सरडा यांचीही रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली आहे. या तिन्ही आरोपींना मागील चार दिवसांपासून अलिबाग नगरपालिका शाळेत कैद्यांसाठी असलेल्या क्वारंटाइन सेंटर मध्ये ठेवण्यात आलं होतं.
-
अर्णब गोस्वामी व अन्य दोन आरोपींनी अटकेला आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयात याचिका केलेली आहे. या याचिकेवरील निकाल न्यायालयानं ९ नोव्हेंबरपर्यंत राखून ठेवला आहे.
-
(संग्रहित छायाचित्र)
-
माझा जीव धोक्यात आहे. मला माझ्या वकिलांशी बोलू दिलं जात नाही आणि आज सकाळी मला मारहाण करण्यात आली. याविरोधात आवाज उठवा," असं गोस्वामी यांनी या व्हिडीओत म्हटलं आहे.
-
-
"माझा जीव धोक्यात आहे. आज सकाळी मला ६ वाजता उठवण्यात आलं आणि सांगितलं गेलं की, मला माझ्या वकिलांशी बोलण्याची परवानगी नाही. मला धक्का दिला आणि मारहाणही केली. कृपा करा, देशातील लोकांना सांगा, माझा जीव धोक्यातआहे," असं गोस्वामी म्हणाले.
-
"सर्वोच्च न्यायालयाला सांगा, मला तुरूंगात मारहाण झाली आहे. मला वाटतं की, सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणात हस्तक्षेप करावा. मला वाटतं की सर्वोच्च न्यायालयानं माझी मदत करावी," असंही गोस्वामी यांनी म्हटलं आहे.
-
अलिबाग येथील वास्तूविषारद अन्वय नाईक यांनी २०१८ मध्ये आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेल्या नोटमध्ये संपादक अर्णब गोस्वामी यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला होता. तसेच आत्महत्येसाठी त्यांना जबाबदार ठरवण्यात आलेलं आहे. (छायाचित्र/एएनआय)
-
प्रकरणी नाईक यांच्या कुटुंबीयांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली होती. त्यानंतर अचानक बुधवारी सकाळी रायगड पोलिसांनी गोस्वामी यांना मुंबईत अटक केली होती. (छायाचित्र/Twitter/Shajahan_inc)

Anna Hazare : ‘अण्णा आता तरी उठा….’, पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी व्यक्त केली नाराजी; म्हणाले, “९० वर्षांनंतरही…”