भांडणामुळे लग्न होण्याआधीच एखाद्याचं प्रेयसीसोबत ब्रेकअप झालं तर तो दु:खी होऊन तो नैराश्यात जातो. अशा परिस्थितीत ती व्यक्ती चुकीचंही पाऊल उचलू शकतो. पण अशा परिस्थितीत एक व्याक्तीनं उचलेलं पाऊल सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. ज्या व्यक्तीवर आपले सर्वात जास्त प्रेम असते त्याच्यासोबत जर नाते तुटले तर साहजिकच माणूस खूप दुःखी होतो. मात्र, हे कधी विसरता कामा नये की, दूसऱ्या कोणावर प्रेम करण्यापेक्षा पहिल्यांदा स्वतःवर प्रेम करणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यक्तीबाबत सांगणार आहोत ज्याने आपल्या होणाऱ्या बायकोशी नाते तुटल्यानंतर दुःखी न होता स्वतःशीच लग्न केले आहे. या व्यक्तीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ब्राझीलमधील डॉ. डिओगो रबेलो या व्यक्तीनं प्रेयसीसोबत ब्रेकअप झाल्यामुळे स्वता:शीच लग्न केलं आहे. सोशल मीडियावर हा चर्चेचा विषय आहे. डॉ. डिओगो रबेलो यांचं प्रेयसी विटोर ब्युनोसोबत नोव्हेंबर २०१९ मध्ये साखरपुडा झाला होता. सप्टेंबर २०२० मध्ये दोघेंही थाटात लग्न करणार होते. मात्र, डिओगे आणि विटोर यांचं लग्न झालं नाही. दोघांमध्ये होणारी सतत भांडण आणि वादविवाद यासाठी कारणीभूत होता. त्यामुळे दोघांनी सामंजस्यानं वेगळं होण्याचा निर्णय घेतला. जुलै २०२० मध्ये डिओगे यांना प्रेयसी सोडून गेली आणि त्यांचं ब्रेकअफ झालं. नातं तुटल्यानंतर डिओगो यांच्या मनात वेगळेच काहीतरी चालू होतं. डिओगो यांनी ठरवलेल्या तारखेलाच लग्न करायचा निर्णय घेतला. जसं क्वीनमध्ये अभिनेत्रीनं लग्न मोडल्यानंतर एकटं हनिमूनला जायचा निर्णय घेतला होता. असाच निर्णय डिओगे यांनी घेतला होता. डिओगो यांनी ठरलेल्या वेळेत लग्न करण्याची सर्व तयारी केली. ठरलेले सर्व कार्यक्रम वेळेप्रमाणे करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी स्वतःशीच लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार डिओगो यांनी १७ ऑक्टोबर रोजी एका लग्झरी हॉटेलमध्ये स्वत:शीच लग्न समारंभाचे आयोजन केले. करोना विषाणूमुळे या समारंभात फक्त ४० लोक उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत डिओगो स्वतःसोबत विवाहबंधनात अडकले. यासंदर्भात डिओगो यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये डिओगे म्हणालेत की, प्रेयसीसोबतचं नात तुटल्यानंतर महिनाभर मी परिस्थिती समजून घेतली अन् त्यानंतर स्वतःवर प्रेम आणि स्वतःचं कौतुक करायला लागलो. स्वत:शी लग्न करत मी लोकांना सांगू इच्छूतो की, आनंदात राहण्यासाठी लग्नावर अवलंबून राहण्याची शक्यता नाही. लग्न केल्यानंतरच आनंद मिळतो असं काही नाही. एका पोस्टमध्ये डिओगो यांनी त्या सर्व लोकांचे आभार मानले ज्यांच्या पाठिंब्यामुळे त्यांना त्यांच्या जीवनातील कठिण काळातून बाहेर पडण्यास मदत मिळाली. दुसऱ्या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या पूर्व प्रेयसीचे आभार मानले आहेत. स्वत:शी लग्न केल्यानंतर डिओगो म्हणाले की, आजचा दिवस माझ्यासाठी सर्वात आनंदाचा दिवस आहे. कारण माझ्या जीवनात आज मी त्यांच्यासोबत आहे ज्यांच्याशी मी खूप प्रेम करतो. (सर्व फोटो डिओगो यांच्या इन्स्टाग्रामहून घेतले आहेत.)

सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींचं दार; १२ महिन्यांनंतर भद्र महापुरुष राजयोगानं संपत्तीत होणार प्रचंड वाढ