-
हक्काचे यश मिळेल_ गुरू चंद्राचा शुभयोग फलदायी ठरेल. मानसिक कुचंबणेतून बाहेर पडून नवीन गोष्टींना प्राधान्य द्याल. कंटाळवाणी वाटणाऱ्या कामाचा बोजा हलका होईल. टप्प्याटप्प्याने वाढणारा व्यवसाय अनेक क्षेत्रांत बदल करेल. सर्व स्तरांवर मोठे पाऊल उचलणे शक्य नव्हते. सध्या ती परिस्थिती राहणार नाही. व्यापारउद्योगात हक्काचे यश मिळेल. नोकरदार वर्गाला बढतीचे संकेत मिळतील. ज्येष्ठ व्यक्तींचा पािठबा उत्तम राहील. जबाबदारी वाढल्याने कामातील परिश्रम वाढतील. आर्थिक कुचंबणा कमी होऊ लागेल. सामाजिक क्षेत्रात एक पाऊल पुढे जाण्याचे संकेत मिळू लागतील. सहकाऱ्यांनी केलेल्या कामकाजात पारदर्शकता राहील. नातेवाईकांशी कार्यक्रमानिमित्त भेट होईल. संततीकडून मिळणारा प्रतिसाद उत्तम असेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. शारीरिक दुखणे कमी होईल. शुभ दिनांक : २६, २७ महिलांसाठी : आवडीच्या क्षेत्रात पदार्पण कराल. (स्मिता अतुल गायकवाड)
-
ध्येय साध्य होईल_शुभदायक ग्रहांचा प्रवास पाहावयास मिळेल. अडकत जाणाऱ्या प्रश्नांना मार्ग मिळेल. उशिरा का होईना फळ मिळाल्याचा आनंद तुमच्या चेहऱ्यावर असेल. व्यवसायात कमी-जास्त प्रमाणात असलेला चढ-उतार सध्या जाणवणार नाही. काही मोठे प्रस्ताव समोर आल्याने तारांबळ उडेल. अनपेक्षित ध्येय साध्य होईल. ग्राहकांचा प्रतिसाद उत्तम मिळेल. नोकरदारांना मोठी संधी चालून येईल. या संधीचा लाभ उठवण्यासाठी तत्पर राहाल. कामातील तांत्रिक अडचणी कमी होतील. आर्थिक उत्पन्न वाढते राहील. सर्वागीण विकास घडेल. स्थावर मालमत्तेचा प्रश्न निकालात लागेल. नातेवाईकांकडून कौतुकाची थाप मिळेल. कुटुंबातील सदस्यांची विचारपूस करा. धार्मिक गोष्टींचा उत्साह वाढेल. मानसिक शांती लाभेल. चिडचिडपणा कमी केल्यास आरोग्य उत्तम राहील. शुभ दिनांक : २१, २२ महिलांसाठी : जोडीदाराच्या भावनेचा आदर करा.
-
समीकरण जुळून येईलः या सप्ताहात होणारे बदल प्रतिकूलता कमी करणारे असतील. विशिष्ट कार्यप्रणाली अस्तित्वात येईल. थांबलेल्या कामांना पुन्हा गती प्राप्त होईल. दूरवरचा विचार करणे सध्या गरज भासणार नाही. व्यापारी क्षेत्रात मोठी भरारी माराल. नवीन व्यवसायासाठी विचार करायला हरकत नाही. केलेल्या नियोजनाचे समीकरण जुळून येईल. कला क्षेत्रातून येणारे प्रस्ताव यशदायी ठरतील. ज्येष्ठ व्यक्तींचा मार्गदर्शन सल्ला महत्त्वाचा ठरेल. नोकरदार वर्गाने ठरवलेली कामे निश्चितपणे पूर्णत्वाला जातील. वाढलेला आत्मविश्वास योग्य निर्णय घेण्यास फायदेशीर ठरेल. पैशांच्या अडचणी कमी होतील. सामाजिक क्षेत्रात विचारांची देवाणघेवाण उत्तम राहील. घरगुती कलह कमी होईल. वैवाहिक जीवनातील सूर जुळणारे असतील. प्रकृती ठणठणीत असेल. शुभ दिनांक : २१, २४ महिलांसाठी : दगदग कमी होईल.
-
परिणाम उत्तम राहील_पूर्वार्धात खर्च वाढेल, पण तो योग्य कारणासाठी असेल. एखाद्या कामाविषयी वाटणारी धाकधूक कमी होईल. ग्रहांचा परिणाम उत्तम राहील. व्यवसायात उशिरा का होईना प्रगती जाणवू लागेल. ग्राहक वर्गाला संतुष्ट ठेवण्यासाठी जाहिरात माध्यमाचा वापर करावा लागेल. त्यातून मिळणारे यश फायद्याचे प्रमाण वाढवणारे असेल. नोकरदारांना संशोधनात्मक गोष्टीत यश मिळेल. नव्या प्रशिक्षणाचा खऱ्या अर्थाने लाभ होईल. विविध स्तरांवर निर्माण झालेले प्रश्न सोडवणे सोपे होईल. धनदायक गोष्टी मार्गी लागतील. राजकीय क्षेत्रात जुन्या वादविवादाच्या भोवऱ्यात अडकू नका. धाडसी पाऊलवाटेवर कुटुंबातील सदस्यांची साथ मिळेल. विवाहविषयक बोलणी यशस्वी ठरतील. धार्मिक गोष्टीतील उत्साह वाढता राहील. शारीरिकदृष्टय़ा योग्य साधनेला महत्त्व द्या. शुभ दिनांक : २४, २५ महिलांसाठी : स्वत:चे कर्तृत्व सिद्ध कराल.
-
विविध योजनांचा लाभ_लाभस्थानातून होणारे चंद्राचे भ्रमण विविध योजनांचा लाभ मिळवून देणारे ठरेल. नव्या आकांक्षांना पालवी फुटेल. नवीन परिचयातून व्यवसायात वाढ होईल. नाटय़ संगीत, शिल्पकला, फोटोग्राफी व्यवसायांना नवी दिशा मिळेल. व्यावसायिकदृष्टय़ा मिळालेले यश बरेच बदल घडवून आणतील. उद्योगधंद्यात कर्तृत्वाची चमक दिसून येईल. नोकरदार वर्गाला ज्या जबाबदाऱ्या पार पडणे शक्य नव्हते, अशा जबाबदाऱ्या पूर्णत्वाला जातील. वाढलेला मानसिक ताण कमी होईल. मोठय़ा व्यक्तींकडून मिळालेली सहानुभूती मनाचा उत्साह वाढवणारी असेल. खर्चाला आवर घातल्यास आर्थिक बाबतीत वाढ होऊ शकते. सामाजिक क्षेत्रात चतुरपणाने वागण्यातच मोठे कौशल्य असेल. मित्रमंडळींचे सहकार्य उत्तम मिळेल. जोडीदाराशी गोड बोलून कार्य साध्य कराल. शारीरिकदृष्टय़ा ताण येणार नाही याची काळजी घ्या. शुभ दिनांक : २१, २६ महिलांसाठी : आध्यात्मिक गोष्टीतून मानसिक समाधान लाभेल.
-
घडामोडी होत राहतील_ग्रहांचा सूर ऊनसावलीप्रमाणे जाणवत असला, तरी तो वाईटही नाही. शंका-कुशंकांचे वादळ बाजूला ठेवा. कामाच्या दृष्टीने प्रयत्न कसे वाढवता येतील याकडे लक्ष द्या. इतरांविषयी वाटणारा गरसमज वेळीच दूर करा. व्यापार-उद्योगात अवतीभवतीच्या लोकांचा विचार करणे टाळा. मिळालेल्या संधीचा फायदा उठवा. स्वत:ला कष्ट पडले तरी चालतील, पण जबाबदारी इतरांवर टाकू नका. नोकरदारांना वरिष्ठांकडून अपेक्षित प्रसाद मिळेल. वेळापत्रकाप्रमाणे ठरवलेले कामकाजाचे आयोजन यशस्वी ठरेल. खर्चाच्या बाबतीत मात्र टांगती तलवार नेहमीप्रमाणे राहणार नाही, याची दक्षता घ्या. अनावश्यक गोष्टींचा खर्च कमी करा. सामाजिक संकल्पना पूर्ण होतील. कौटुंबिक घडामोडी होतील. प्रकृतीबाबतीत सकारात्मक बदल घडतील. शुभ दिनांक : २४, २५ महिलांसाठी : चढ-उतारातूनच यश मिळणार हे लक्षात ठेवा.
-
आर्थिक सुलभता वाढेल_चंद्र भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे भ्रमण करीत आहे. ध्येयापर्यंत पोहोचण्यास वेळ लागणार नाही. तुटलेला संपर्क पुन्हा संपुष्टात येईल. मनाविरोधी होणाऱ्या घटनांचा क्रम कमी होईल. उद्योगधंद्यांना चालना मिळेल. नियम व अटींचे पालन केल्यास, कारखानदारीचा प्रश्न मार्गी लागेल. प्रत्येक गोष्टीत वाटणारी प्रतिकूलता कमी झाल्याने, कामातील उत्साह वाढेल. कर्मचारी वर्गाला परिवर्तन घडलेले दिसून येईल. वरिष्ठांनी दिलेली जबाबदारी स्वीकारावी लागेल. महत्त्वाच्या मुद्दय़ांवर चर्चा होईल. त्यातून नवीन काही गोष्टी शिकावयास मिळतील. वेतनवाढीचा प्रश्न निकालात लागेल. आर्थिकदृष्टय़ा सुलभता वाढेल. राजकीय क्षेत्रातील विस्कळीत झालेली घडी पुन्हा सुरळीत होऊ लागेल. नात्यातील स्नेह वृिद्धगत होईल. मुलांसाठी आगामी काळासाठी नवीन गुंतवणूक कराल. कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवाल. प्रकृती ठणठणीत असेल. शुभ दिनांक : २१, २२ महिलांसाठी : आवडीच्या क्षेत्रात कार्यरत राहाल.
-
क्रियाशील राहा_भाग्यस्थानातील चंद्राचा रवी व गुरूशी होणारा योग मानसिक परिवर्तन घडवेल. छोटय़ा गोष्टीतून होणारा मनस्ताप कमी होईल. व्यावसायिकदृष्टय़ा अनेक प्रयत्न यशस्वी होतील. स्थिर अवस्था यायला आता वेळ लागणार नाही. आतापर्यंत ठेवलेला संयम सोडू नका. कोणतेही पाऊल उचलताना क्रियाशील राहा. नोकरदार वर्गाला कमी वेळेत कामे पूर्ण करून द्यावी लागतील. वारंवार होणाऱ्या चुका वेळीच सुधारा. इतरांशी स्पर्धा करणे टाळा. महत्त्वाच्या संक्षिप्त बाबी विचारात घेऊन बदल करा. आर्थिक बाजू भक्कम होईल. राजकीय क्षेत्रातील वर्चस्व वाढेल. नातेवाईकांशी कार्यक्रमानिमित्त भेट होईल. भावंडांशी जवळीक निर्माण होईल. संततीची गोड बातमी कळेल. मानसिकदृष्टय़ा कणखर राहा. प्रकृतीविषयक पथ्यपाणी सांभाळा. शुभ दिनांक : २४, २५ महिलांसाठी : अंतर राखून वागा.
-
नियोजन महत्त्वाचे असेल_ग्रहमान संमिश्र असेल. बारीकसारीक गोष्टींवरून सतत हुरहुर लावून घेऊ नका. विचारांची घालमेल कमी करा. द्विधा अवस्थेतून बाहेर या. कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींना महत्त्व देणे टाळा. व्यावसायिकदृष्टय़ा मोबदला कसा मिळेल ते बघा. इतरांवर स्पर्धा करण्याची ही वेळ नाही. जुन्या अनुभवांचा आढावा घ्या. प्रत्येक कामामध्ये नियोजन महत्त्वाचे असेल तरच अपेक्षित ध्येयापर्यंत जाऊ शकाल. नोकरदार वर्गाला कामाचा तपशील स्वत: सादर करणे महत्त्वाचा राहील. कामाच्या ठिकाणी नोंदी चोख ठेवा. हलगर्जीपणा टाळून महत्त्वाच्या बाबी लक्षात घ्या. नको त्या ठिकाणी खर्च होणार नाही, याची काळजी घ्या. राजकारणातील तिढा सुटणारा असेल. भावंडांचा प्रतिसाद उत्तम मिळेल. नवीन नात्यात वाढ होईल. आहारावरती नियंत्रण ठेवा. शुभ दिनांक : २६, २७ महिलांसाठी : सरळमार्गी वाटचाल ठेवा.
-
मध्यस्थी करणे टाळा_चंद्राचे भ्रमण षष्ठस्थानातून अष्टमस्थानाकडे होत आहे. अडचणीचा कालावधी उभा राहणारा असला, तरी तो सुटणाराही आहे. मनाची सक्षमता वाढवल्यास कोणतीही गोष्ट अवघड वाटणार नाही. तेव्हा धीर धरून कामाला लागा. व्यवसायवाढीसाठी घाईची कृती करू नका. मोठी गुंतवणूक सध्या न केलेली चांगली. व्यवहार करताना भावनिक गोष्टीत गुंतू नका. इतरांच्यात मध्यस्थी करणे टाळा. नोकरदारांना शांततेने कामाचा आढावा घ्यावा लागेल. कार्यमग्न राहिला तर मनस्ताप होणार नाही. आर्थिकदृष्टय़ा तडजोडी स्वीकारा. राजकीय क्षेत्रात दोन शब्द कमी बोललेले चांगले. एकटेपणामध्ये न राहता कुटुंबात मिळून मिसळून राहा. आध्यात्मिक गोष्टीत मन रमवा. आरोग्याच्या दृष्टीने काळजी घ्या. शुभ दिनांक : २४, २५ महिलांसाठी : प्रत्येक दिवसाची सुरुवात चांगली कशी होईल, याकडे लक्ष द्या.
-
प्रगतीकडे वाटचाल_साडेसातीतून जरी प्रवास चालू असला, तरी कष्टाचे फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. अडकून राहिलेल्या कामाचा आराखडा पूर्ण होण्याच्या मार्गी असेल. व्यावसायिक वाटचाल प्रगतीकडे असेल. व्यवसायातील बारीकसारीक गोष्टींचा विचार करता फायदा कमी, पण तोटय़ाचे प्रमाणही कमी आहे. नियोजनात्मक केलेल्या गोष्टीत परिपूर्ण यश मिळेल. नोकरदार वर्गाला धावपळीच्या कालावधीतून जावे लागेल. कामासाठीच वेळ दिल्याने बाकी राहिलेल्या कामाचा ताण कमी होईल. बोलण्यातून गरसमज वाढणार नाही, याची मात्र दक्षता घ्या. अर्थतंत्राला नवीन वळण मिळेल. सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करा. घरातील ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घ्या. मुलांसाठी ठरवलेल्या नियोजनात बदल करू नका. वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होऊ लागतील. शुभ दिनांक : २१, २२ महिलांसाठी : तारेवरची कसरत कमी होईल.
-
उद्योगव्यवसायात वाढ_ग्रहांची स्थिती पूरक असल्याने ठरवल्याप्रमाणे कामे होत राहतील. वेळोवेळी पाठपुरावा कराव्या लागणाऱ्या गोष्टींचा सामना कमी होईल. त्यामुळे अनेक क्षेत्रांत सरशी होईल. आयात-निर्यात व्यापारात पूर्वीपेक्षा कष्ट कमी पडतील. विनाकारण लांबत जाणाऱ्या बाबींना पूर्णविराम मिळेल. उद्योगव्यवसायात वाढ होईल. सप्ताह बऱ्यापैकी दिलासा देणारा ठरेल. नोकरदारांना नवीन योजना अमलात आणण्यास वरिष्ठांचे सहकार्य उत्तम राहील. मागील कामांची उणीव भरून काढाल. इतरांची देणी वेळेत भागवाल. आर्थिकदृष्टय़ा अस्थिरता निर्माण होणार नाही. राजकीय क्षेत्रातील कल उंचावलेला असेल. नव्या मत्रीशी हातमिळवणी कराल. संततीविषयक प्रश्न मार्गी लागतील. घरगुती वातावरण उत्साहवर्धक असेल. प्रकृती ठणठणीत राहील. शुभ दिनांक : २४, २५ महिलांसाठी : इतरांना दिलेला शब्द वेळेत पूर्ण कराल.

India Postal Service : डोनाल्ड ट्रम्प यांच्या ५० टक्के टॅरिफनंतर भारताचं मोठं पाऊल; अमेरिकेला जाणारी ‘ही’ सेवा स्थगित करण्याची घोषणा