-
राज्यात संचारबंदी लागू करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकांची उपासमार होऊ नये म्हणून शिवभोजन थाळी मोफत देण्याची घोषणा केली. (सर्व फोटो – पवन खेंगरे, इंडियन एक्सप्रेस)
-
यापूर्वी गतवर्षीच्या टाळेबंदीच्या काळात पाच रुपये दराने शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणावर मजूरवर्गाला या योजनेचा लाभ झाल्याचं दिसलं होतं. यावेळी थाळी मोफत देण्यात येत आहे.
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सर्वात महत्वाकांक्षी योजना म्हणून शिवभोजन थाळीकडे पाहिले जाते. ज्यांच्याकडे स्वत:चे घर नाही, रोजच्या जेवणाची भ्रांत आहे. ज्यांच्या घरात चूल पेटत नाही, अशा निराश्रित, निराधार, बेघर नागरिकांना रोजच्या जेवणाची सुविधा शिवभोजन थाळी योजनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
-
राज्यातील सर्वच शहरांमध्ये शिवभोजन थाळी केंद्र सुरू असून, पुण्यातही मोफत शिवभोजन वाटप केलं जात आहे.
-
पुणे महापालिकेतील हॉटेल निशिगंधा, बुधवार पेठेतील श्री स्वामी समर्थ कृपा स्नॅक्स सेंटर, कात्रज कॉर्नर येथील जेएसपीएम उपाहारगृह, शुक्रवार पेठेतील एस. कुमार वडेवाले, मार्केटयार्डमधील श्री स्वामी समर्थ टी अॅण्ड स्नॅक्स, स्वारगेट एसटी आगार येथील के. जी. गुप्ता अॅण्ड सन्स स्नॅक्स, कौटुंबिक न्यायालय परिसरातील श्री स्वामी समर्थ स्नॅक्स अॅण्ड टी हाऊस, बिबवेवाडीतील हॉटेल हृदयसम्राट, मांजरीतील हॉटेल कप्तान, बुधवार पेठेतील ग्रीन पॅलेस रेस्टॉरंट, मार्केटयार्डातील समाधान गाळा क्र. ११, महात्मा फुले मंडई, हडपसर गाडीतळ येथील शिवसमर्थ भोजनालय, पुणे-सातारा रस्त्यावरील हॉटेल साईनाथ व्हेज या ठिकाणी शिवभोजन थाळी मिळत आहे.
-
त्याचबरोबर खराडीमधील थिटे वस्ती येथील हॉटेल कोल्हापूरी तडका, घोरपडीतील हॉटेल यशोदा, औंधमधील प्रतिभा महिला प्रतिष्ठान, धानोरीतील सागर रेस्टॉरंट, पिंपरी-चिंचवड महापालिके चे उपाहारगृह, यशवंतराव चव्हाण रुग्णालय, वल्लभनगर बसस्थानक, चिंचवडमधील संभाजीनगर येथील श्री गणेश स्वीट्स अॅण्ड भोजनालय,सांगवीतील श्री प्रसाद फूड हॉस्पिटॅलिटी अॅण्ड भोजनालय, चिंचवडमधील मनपा व्यापारी संकु लातील सुनेत्रा महिला बचत गट आणि आकु र्डी रेल्वे स्थानक एकत्व फार्मर प्रोड्युसर कंपनी या ठिकाणीही शिवभोजन थाळी केंद्र सुरू आहे.
-
निर्बंध वाढवण्यात आल्यानंतर शिवभोजन केंद्राची वेळही सकाळी ११ ते दुपारी तीन अशी वाढविण्यात आली आहे. त्यामुळे अल्प मिळकत असणाऱ्यांसाठी ही योजना उपयोगी ठरत आहे.

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल