-
उत्तर प्रदेशातील अयोध्या जिल्ह्यात रामाच्या मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. काम पूर्ण होण्याची अपेक्षित तारीख (2024) जवळ आल्याने लोकांचा उत्साहही वाढला आहे.
(फोटो – रॉयटर्स) -
रामजन्मभूमी (रामायणानुसार भगवान रामाचे जन्मस्थान) येथे राम मंदिर बांधले जात आहे. जानेवारी २०२४ पर्यंत बांधकाम पूर्ण होणार असल्याचं सांगण्यात येतंय.(फोटो – रॉयटर्स)
-
५ ऑगस्ट २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन विधी पार पडला. या परिसरात गणेश, सूर्य, शिव, दुर्गा, अन्नपूर्णा (देवी) आणि हनुमान देवतांचीही मंदिरे असतील. (फोटो – रॉयटर्स)
-
अयोध्येतील हिंदू राम मंदिराच्या बांधकामाधीन जागेत माकडे मुक्त संचार करतात. (फोटो – रॉयटर्स)
-
बांधकाम वेळेत होण्याकरता जोरदार प्रयत्न सुरू आहेत, अनेक भक्त रामलल्लाचे दर्शन घेण्याकरता आतुर झाले आहेत. (फोटो – रॉयटर्स)
-
ऐतिहातिस राम मंदिरासंबंधित कोर्टाने निर्णय दिला तेव्हा संपूर्ण भारतभर एकच जल्लोष झाला होता. त्यानंतर लागलीच राम मंदिराच्या कामासाठी तयारी सुरू करण्यात आली होती. (फोटो – रॉयटर्स)
-
दरम्यान, अयोध्या येथील राम मंदिरासाठी १८०० क्यूबिक मीटर सागवान लाकूड चंद्रपूर जिल्ह्यातून पाठविण्यात आली आहेत. (फोटो – रॉयटर्स)
-
बांधकाम कंपनी लार्सन आणि टुब्रो (Larsen & Toubro) कंपनीकडे राम मंदिराच्या निर्माणाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. ज्यासाठी १८०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. . (फोटो – रॉयटर्स)
-
टाटा कन्सल्टिंग इंजिनीअर्स यांचीही व्यवस्थापक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. (फोटो – रॉयटर्स)
-
तीन मजली राम मंदिराची लांबी ३८० फूट, रुंदी २५० फूट आणि उंची १६१ फूट एवढी आहे, अशी माहिती प्राधिकरणाने दिली. गर्भगृहाव्यतिरिक्त मंदिर परिसरात पाच मंडप असणार आहेत. गूढ मंडप, रंग मंडप, नृत्य मंडप, प्रार्थना मंडप आणि कीर्तन मंडप अशी इतर पाच दालने असल्याची माहिती पीटीआयने दिली आहे. (फोटो – रॉयटर्स)
-
पाचही मंडपांच्या घुमटाची रुंदी ३४ फूट आणि लांबी ३२ फूट आहे. तसेच जमिनीपासूनची उंची ६९ फूट ते १११ फूट एवढी आहे. राजस्थानमधील बन्सी पहाडपूर येथील शिला वापरून मंदिराचे बांधकाम करण्यात येत आहे. मकर संक्रांतींच्या मुहूर्तावर राम मंदिराच्या प्रतिमेचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मकर संक्रांतीचा मुहूर्त साधता येतोय का हे पाहावं लागणार आहे. (फोटो – रॉयटर्स)

चंद्रग्रहणाचा सुतक काळ…’ही’ वेळ खूप सांभाळायची आहे! यंदा ९ तास आधीच सुरू होणार, नियम, वेळ जाणून घ्या