-    बांगलादेशातील हिंसक निदर्शनांदरम्यान शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देश सोडला आहे. दरम्यान, हिंसाचाराच्या दरम्यान आंदोलकांनी माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या घरात म्हणजेच पंतप्रधानांच्या निवासस्थानात घुसून गोंधळ घातला आणि लुटमार केली. 
-    सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ आणि फोटोंमध्ये आंदोलक पंतप्रधानांच्या निवासस्थानातून सामान घेऊन जाताना दिसत आहेत. 
-    आंदोलकांनी शेख हसीना यांच्या खोलीतून त्यांची साडीही लुटली. 
-    ढाका येथील पंतप्रधानांचे शासकीय निवासस्थान असलेल्या गणो भवन येथे लुटमार करताना सापडलेल्या वस्तू आंदोलकांनी पळवून नेल्या. 
-    आंदोलक शेख हसीना यांच्या निवासस्थानातून एक बकरी घेऊन जात असल्याचेही या फोटोत दिसून आले आहे. 
-    या छायाचित्रात दिसत आहे की काही आंदोलक पंतप्रधानांच्या निवासस्थानी घरच्या सारखे आराम करताना दिसले, तर काहीजण जेवण करतानाही दिसले. 
-    चोरी आणि लुटीचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. 
-    आंदोलक पंतप्रधान निवासस्थानातून संगणक, मोठे खोके, बदके, चहाचे कप, भांडी, कार्पेट, फर्निचर आणि पेंटिंग्स घेऊन जाताना दिसले. 
-    आंदोलकांनी शेख हसीना यांचा ब्लाउज आणि अंडरगारमेंटही सोडले नाही. 
-    गोंधळाच्या वेळी, ज्याला जे काही सापडले तो ते घेऊन पळून गेला. 
-    यादरम्यान, आंदोलकांना रोखणारे कोणीच नव्हते. 
-    एक तासाच्या लुटमारीनंतर सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आंदोलकांचा पाठलाग केला. 
-    शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर शेकडो आंदोलकांनी त्यांच्या निवासस्थानावर हल्ला केला होता. 
-    घरात आंदोलकांची गर्दी असल्याचे या छायाचित्रात दिसत आहे. 
 (Photos Source: REUTERS and Instagram)
 
  Ajit Pawar: अजित पवार आणि अंजना कृष्णा प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “खूप वेळा…” 
   
  
  
  
  
  
  
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  