गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सात पोलीस शहीद झाले आहेत. (छायाः लोकसत्ता)
जागतिक मातृदिनानिमित्ताने शाळकरी मुलांनी मानवी साखळी करून ‘माँ’ असे अक्षर तयार केले होते. (छायाः पीटीआय)
लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात होणा-या निवडणूक प्रक्रियेत मतदानाचे आवाहन करण्यासाठी शाळकरी मुलांनी हातात दिवे घेऊन मानवी साखळी तयार केली होती. (छायाः पीटीआय)
श्रीनगरमध्ये बेकायदा बांधकामे पाडायला विरोध करणा-या नागरीकांनी दगडफेक केल्यानंतर परिस्थितीत आटोक्यात आणण्याच्या कामास लागलेले सुरक्षा जवान. (छायाः पीटीआय)
मुंबईचे मानचिन्ह असलेल्या ६०० वष्रे जुन्या बाणगंगा तलावातील पाण्याची पातळी सध्या कमी झाली आहे. देखभालीच्या कामासाठी पाण्याचा उपसा करण्यात आल्याचा फटका या तलावास बसला आहे. (छायाचित्र : प्रशांत नाडकर)