-
अनेक देशांत इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी दिवसेंदिवस वाढत आहे. वाढते प्रदूषण आणि पेट्रोल-डिझेल इंधनावरील खर्च कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यावर नागरिक भर देत आहेत. (फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
वाटचाल करत आहेत. त्यानुसार सर्वाधिक इलेक्ट्रिक कार असलेले टॉप १० देश जाणून घेऊयात. न्यूज १८ ने एका वृत्तात या संदर्भातील माहिती दिली आहे. (फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
चीन : २०२४ पर्यंत चीन २० दशलक्षाहून अधिक इलेक्ट्रिक कारसह बाजारपेठेत आघाडीवर आहे. गेल्या वर्षी त्यांनी अंदाजे १.१ कोटी इलेक्ट्रिक वाहने विकले आहेत. जे एकूण विकल्या गेलेल्या वाहनांच्या जवळपास निम्मे होते. (फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
अमेरिका : अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांच्याकडे सुमारे ७० लाख इलेक्ट्रिक कार आहेत. गेल्या वर्षी देशात सुमारे १.६ दशलक्ष इलेक्ट्रिक कार विकल्या गेल्या आहेत. (फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
जर्मनी : युरोपमधील ईव्ही बाजारपेठेत जर्मनी आघाडीवर आहे. जिथे सुमारे १.४ दशलक्ष कार आहेत. तथापि नवीन कार विक्रीत ईव्हीचा वाटा किंचित कमी झाला आहे. (फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
फ्रान्स : जर्मनीच्या पाठोपाठ फ्रान्स आहे. त्यांच्याकडे सुमारे १.३ ते १.४ दशलक्ष ईव्ही कार आहेत. २०४० पर्यंत पेट्रोल आणि डिझेल कार टप्प्याटप्प्याने बंद करण्याच्या संकल्पासह हा देश ईव्हीला पाठिंबा देत आहे.(फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
यूके: पहिल्या पाच देशांमध्ये युनायटेड किंग्डमचा समावेश आहे. जिथे अंदाजे १.३ दशलक्ष इलेक्ट्रिक कार रस्त्यावर आहेत. नवीन कार विक्रीपैकी अंदाजे २५% इलेक्ट्रिक आहेत. (फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
नॉर्वे : कमी लोकसंख्या असूनही ईव्हीच्या बाबतीत नॉर्वे आघाडीवर आहे. २०२४ पर्यंत रस्त्यावर सुमारे ९००,००० ईव्ही असल्याचा अंदाज होता. नवीन कार विक्रीपैकी ९५% विक्री इलेक्ट्रिकची होती. (फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
नेदरलँड्स : रस्त्यांवर सुमारे ५,६०,००० इलेक्ट्रिक वाहनांसह नेदरलँड्स ७ व्या स्थानावर आहे. २०२३ मध्ये विकल्या गेलेल्या सर्व कारपैकी जवळजवळ ३० टक्के इलेक्ट्रिक गाड्या होत्या. (फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
स्वीडन : स्वीडनचा २०२३ मध्ये कार विक्रीपैकी जवळजवळ ४० टक्के इलेक्ट्रिक कार होत्या. ज्यामुळे ते युरोपमधील सर्वात वेगाने वाढणाऱ्या ईव्ही बाजारपेठांपैकी एक बनले आहेत.(फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
कॅनडा : कॅनडामध्ये सुमारे ५,५०,००० इलेक्ट्रिक कार आहेत. ज्यामध्ये २०२३ च्या सुरुवातीला नवीन विक्रीपैकी ९-१० टक्के ईव्ही असतील. (फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
दक्षिण कोरिया : जवळजवळ ५,००,००० इलेक्ट्रिक वाहनांसह हा आशियाई देश टॉप १० मध्ये येतो. नवीन विक्रीत इलेक्ट्रिक कारचा वाटा ७ टक्के पेक्षा कमी आहे, जो मोठ्या वाढीची क्षमता दर्शवितो.(फोटो-संग्रहित छायाचित्र)

Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची रोखठोक भूमिका; म्हणाले, “राजकारण चुलीत गेलं, पण…”