-
प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांनी १९९१ साली टीना मुनीम यांच्याशी लग्न केलं. आज या दोघांचा संसार अगदी सुखात सुरु आहे. असं असलं तरी एक काळ असा होता जेव्हा टीनाबरोबर लग्न करण्यासाठी अनिल अंबानींना अनेक संकटांचा सामना करावा लागला होता. हे प्रकरण एवढं वाढलेलं की टीना अंबानींसाठी अनिल अंबानी घर आणि कुटुंबाला सोडायला तयार झाले होते.
-
अनिल अंबानी आणि टीना मुनीम हे पहिल्यांदा एका लग्न समारंभामध्ये भेटले होते. (PTI Photo by Santosh Hirlekar)
-
अनिल आणि टीना दोघे जेव्हा दुसऱ्यांदा भेटले तेव्हाच अनिल अंबानी टीना यांच्या प्रेमात पडले. त्यानंतर अनिल अंबांनी यांनी टीनाबरोबरच लग्न करण्याचा निर्णय घेतला. (Photo : PTI)
-
अनिल अंबानी यांनी यासंदर्भात आपल्या कुटुंबाला कळवलं. टीनबरोबर अनिल यांना लग्न करायचे असल्याचे ऐकून धीरुभाई खूपच नाराज झाले.
-
कोणतीही अभिनेत्री आपल्या घरची सून होणार नाही असं धीरुभाई यांनी अनिल यांना कठोर शब्दात सांगितले. (Photo : AFP)
-
घरच्यांनी दबाव आणल्यानंतर अनिल यांनी टीनाबरोबर ब्रेकअप केलं.
-
अनिल यांच्याबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर टीना अमेरिकेला गेल्या. (PTI Photo)
-
इकडे अनिल अंबानींसाठी चांगल्या चांगल्या कुटुंबातील मुलींची स्थळं येऊ लागली. मात्र अनिल सर्वांना नकार द्यायचे.
-
त्यानंतर काही वर्षांनी अनिल यांचे टीनाबरोबर बोलणं झालं. त्यानंतर अनिल यांनी पुन्हा आपल्या वडिलांना या लग्नासाठी होकार मिळावा म्हणून गळ घातली. (PTI Photo by Santosh Hirlekar)
-
प्रसारमाध्यमांमधील वृत्तानुसार दुसऱ्यांदा अनिल यांनी टीनाबरोबर लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवल्यानंतर धीरुभाई यांनी नकार दिल्यानंतर अनिल यांनी टोकाची भूमिका घेतली. जर टीना या घऱची सून होऊ शकत नसेल तर मी हे घर सोडून जायला तयार आहे असं अनिल यांनी वडिलांना सांगितलं.
-
मुलानेच घर सोडून जाण्याची धमकी दिल्यानंतर धीरुभाई यांनी मवाळ भूमिका घेतली. धीरुभाई यांनी अनिल आणि टीनाच्या लग्नाला होकार दिला. (PTI Photo/Shashank Parade)
-
टीनाबरोबर लग्न करण्यासाठी परवानगी द्यावी म्हणून अनिल अंबानी यांनी जवळजवळ चार वर्ष आपल्या वडिलांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. (PTI Photo/Mitesh Bhuvad)
-
अनेक संकटांचा समाना केल्यानंतर अखेर १९९१ साली कुटुंबाच्या सहमतीने अनिल आणि टीना विवाहबंधनात अडकले. (PTI Photo by Santosh Hirlekar)
-
लग्नानंतर टीना यांनी एकाही चित्रपटामध्ये काम केलं नाही. (PTI Photo/Mitesh Bhuvad)
-
अनिल आणि टीना यांना अनमोल आणि अंशुल अशी दोन मुलं आहेत. (Photo : Instagram)

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार लवकरच ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ? डिसेंबर २०२५ पर्यंत होऊ शकतात गडगंज श्रीमंत