-
नोव्हेंबरच्या अखेरीस तृणमूल काँग्रेसची चिंता वाढवणारी राजकीय घटना घडली. राज्याच्या राजकारणात दबदबा असलेले आणि पक्षातील महत्त्वाचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला. तिथेच तृणमूल आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. (छायाचित्र/पीटीआय)
-
पश्चिम बंगालमध्ये नव्या वर्षात विधानसभा निवडणुकीचा बार उडणार असला तरी तेथे आतापासूनच फटाके फुटू लागले आहेत. सुवेंदू अधिकारी यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा देऊन ‘ममता दीदीं’ना हादरा दिला. (छायाचित्र/इंडियन एक्सप्रेस)
-
परिवहन, जलसिंचन, जलस्त्रोत व विकास ही महत्त्वाची तीन खाती तसेच हलदिया विकास प्राधिकरणचे अध्यक्षपद त्यांच्याकडे होतं. त्यानंतर अधिकारी यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर पक्ष सदस्यत्वाचा राजीनामाही त्यांनी ममतांकडे सुपूर्द केला. (छायाचित्र/पीटीआय)
-
(छायाचित्र/इंडियन एक्सप्रेस)
-
तब्बल १८ विधानसभा मतदारसंघांवर अधिकारी घराण्याचा प्रभाव टिकवून असल्याने सुवेंदू हे तृणमूलसाठी महत्त्वाचे होते. त्यामुळेच त्यांचं मन वळविण्याचा प्रयत्नही ममता बॅनर्जी यांनी करून पाहिला. (छायाचित्र/इंडियन एक्सप्रेस)
-
ब्रिटिश राजवटीविरोधात लढलेल्या सरकार कुटुंबात जन्मलेले सुवेंदू हे स्वतंत्र बाणा राखणारे नेते म्हणून पश्चिम बंगालच्या राजकारणात परिचित आहेत. सुवेंदू अधिकारी यांना राजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाले. (छायाचित्र/इंडियन एक्सप्रेस)
-
१९८९ मध्ये सुवेंदू अधिकारी यांनी छात्र परिषदेच्या माध्यमातून राजकीय कारकिर्दीला सुरूवात केली. २००६ मध्ये ते ‘कांता दक्षिण’मधून विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर सलग दोनदा तमलूक मतदारसंघाचे खासदार म्हणून संसदेत प्रतिनिधित्व केले. (छायाचित्र/इंडियन एक्सप्रेस)
-
२०१६ मध्ये नंदिग्राममधून निवडून गेल्यानंतर ते कॅबिनेट मंत्री झाले. ममता बॅनर्जी यांचे पुतणे खासदार अभिषेक बॅनर्जी व रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्या पक्षातील चलतीने सुवेंदू अस्वस्थ होते, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालच्या राजकारणात रंगली होती. (छायाचित्र/इंडियन एक्सप्रेस)
-
पूर्व मिदनापूर क्षेत्रात मेळावे घेऊन सुवेंदू अधिकारी यांनी स्वतंत्र चूल मांडण्याचे सूतोवाचही केले होते. मात्र, आता आमदारकी आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं ते भाजपात जाणार असल्याचं बोललं जात आहे. सुवेंदू अधिकारी लवकरच भाजपात दाखल होणार असल्याचं वृत्तही काहा स्थानिक माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे. (छायाचित्र/इंडियन एक्सप्रेस)
-
सुवेंदू अधिकारी यांच्या राजीनाम्यानंतर भाजपानं आनंद व्यक्त केला आहे. त्याचबरोबर पक्षात येण्याचं आवाहनही केलं आहे. याबद्दल अधिकारी यांनी कोणतंही भाष्य केलेलं नाही. मात्र, निवडणुकीच्या आधी तृणमूल काँग्रेसमधून भाजपात मोठी भरती होणार असल्याचं भाजपाचे नेते दावा करत आहेत. (छायाचित्र/इंडियन एक्सप्रेस)

Manoj Jarange Patil Statement: “फक्त एक दिवस आंदोलन…”, मुंबई पोलिसांच्या अटींवर मनोज जरांगे पाटील यांची मोठी प्रतिक्रिया