-
अमेरिकेचे ४६वे अध्यक्ष म्हणून जोसेफ बायडेन ज्युनियर आणि अमेरिकेच्या ४९व्या उपाध्यक्ष म्हणून कमला देवी हॅरिस यांनी बुधवारी स्थानिक वेळेनुसार दुपारच्या प्रहरी आपापल्या पदांची शपथ घेतली आणि अमेरिकेच्या सत्ताकारणात बायडन पर्वाला सुरुवात झाली यासोबतच नवीन इतिहासही रचला गेला. भारतीय वंशाच्या कमला हॅरिस या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती बनल्या. या पदावरील त्या आफ्रिकन आणि आशियाई वंशाच्या पहिल्या व्यक्ती ठरल्या आहेत. कमला हॅरीस यांची आई भारतीय वंशाच्या आहेत. या दोघांवर जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय. पंतप्रधान मोदींनीही ट्विटरद्वारे दोघांचं अभिनंदन केलं, आणि आता थेट पुण्यातूनही कमला हॅरिस आणि जो बायडन यांचं अभिनंदन करण्यात आलंय. दोघांचं अभिनंदन करणारा फ्लेक्स पुण्यात झळकलाय.
-
पादचारी पुलाच्या कमानीवर लागलेल्या या फ्लेक्समध्ये अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा उल्लेख चक्क भाऊ आणि कमला हॅरिस यांचा उल्लेख आक्का असा करण्यात आलाय.
-
या फ्लेक्सचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून सध्या शहरात हा फ्लेक्स चर्चेचा विषय बनलाय.
-
घासून नाय तर ठासून आलोय ! अशा मथळ्याखाली अभिनंदन करणारा हा अनोखा फ्लेक्स पुण्यात झळकलाय. शिवप्रेमी दिव्यांग, लिम्का बूक रेकॉर्डर – पोपटराव जयवंतराव खोपडे यांच्या नावाने हा फ्लेक्स लागला आहे.
-
"जो (भाऊ) बायडन यांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी आणि भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांची उपराष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन…घासून नाय तर ठासून आलोय !", असा संदेश या फ्लेक्सवर लिहिला आहे. यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा मराठी नेटकिडे तात्या ट्रम्प म्हणून उल्लेख करायचे. तर आता या फ्लेक्सच्या निमित्ताने नेटकऱ्यांना जो बायडन यांच्यासाठी भाऊ आणि कमला हॅरिस यांच्यासाठी आक्का हे नवीन नाव मात्र नक्कीच मिळालंय.

७ सप्टेंबरपासून कुबेर ‘या’ ५ राशींसाठी उघडतील खजिन्याचं दार! चंद्रग्रहणाच्या दिवशीच मिळेल अफाट संपत्ती अन् बँक बॅलन्स वाढेल