-
पुणे : आतापर्यंत चंद्राची असंख्य छायाचित्र काढली गेली असतील, पाहिली गेली असतील.
-
पण या सर्वांपेक्षा वेगळे छायाचित्र केवळ सोळा वर्षांच्या हौशी खगोलप्रेमी प्रथमेश जाजू याने टिपले आहे.
-
तब्बल ५० हजारहून छायाचित्रे एकत्र करून १८६ जीबीचे (गिगाबाइट) सुस्पष्ट चंद्रबिंब टिपण्याची कामगिरी प्रथमेशने साधली आहे.
-
मॉडेल कॉलनीतील विद्या भवन या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रथमेश दहावीत आहे. त्याची आई गृहिणी आहे, तर वडिलांचा संगणकाचा व्यवसाय आहे.
-
गेली काही वर्षे तो ज्योर्तिविद्या परिसंस्था या भारतातील खगोलशास्त्रविषयक सर्वांत जुन्या संस्थेशी हौशी खगोलप्रेमी आणि स्वयंसेवक म्हणून जोडलेला आहे.
-
खगोलशास्त्र आणि अवकाशाच्या आवडीमुळे छायाचित्रण करणाऱ्या प्रथमेशने अवकाश छायाचित्रणाची अनेक तंत्र त्याने आत्मसात करून घेतली आहेत.
-
त्यामुळे अनेक प्रयोग करताना त्याने चंद्राचे अतिशय सुस्पष्ट छायाचित्र मिळवले आहे.
-
प्रथमेश म्हणाला, की २०१८ पासून अवकाश छायाचित्रण करत आहे. गेली दोन वर्षे वेगवेगळ्या पद्धतीने अवकाश छायाचित्रण केले आहे.
-
दुर्बिणीचा वापर करून मोझेक स्पेसिंग या तंत्राद्वारे चंद्राचे छायाचित्र टिपले आहे.
-
घराच्या गच्चीवरून चार तास छायाचित्रण करून, त्यातील छायाचित्रांवर जवळपास दोन दिवस प्रक्रिया करून चंद्राचे छायाचित्र मिळवले आहे.
-
चंद्राच्या छायाचित्राचे वैशिष्ट्य म्हणजे हे छायाचित्र ५० हजारांहून अधिक छायाचित्रे एकत्र करून तयार झाले आहे.
-
हे १८६ जीबीचे छायाचित्र आहे. कोणतेही छायाचित्र काढून ते झुम केल्यावर ते धूसर (पिक्सेलाइट) होते.
-
हे छायाचित्र कितीही झूम केले तरी ते धूसर होणार नाही.
-
खगोलशास्त्र, खगोलभौतिकीशास्त्रमध्ये करिअर करायचे आहे.
-
त्यामुळे अकरावीला विज्ञान शाखेला प्रवेश घेणार असल्याचेही प्रथमेशने सांगितले.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रथमेश जाजू / इन्स्टाग्राम)

Uddhav Thackeray : ‘मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे हे मान्य आहे का?’ उद्धव ठाकरे म्हणाले, “मी…”