-
बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'द फॅमिली मॅन २' वेब सीरिजची प्रेक्षकांना अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा होती. ही सीरिज कधी येणार याचीच वाट प्रेक्षक पाहत होते. गुरुवारी रात्री १० वाजताच ही सीरिज रिलीज करण्यात आली. यासीरिजमधील चेल्लम सर या पात्र सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे. त्यावरून अनेक मजेदार आणि खळखळून हसायला लावणारे मीम्स व्हायरल होत आहे. (छायाचित्रं। ट्विटर)
-
'द फॅमिली मॅन २' मध्ये मनोज वायपेयी याच्यासोबत समंथा अक्कीनेनी ही दहशतवादी राजलक्ष्मीच्या भूमिकेतेत आहे. सध्या वेबसीरिजची सगळीकडे चर्चा होत आहे.
-
विशेषतः मनोज वायपेयी आणि समंथाच्या अभियाचं प्रेक्षकांकडून कौतूक होतं आहे.
-
मनोज बाजपेयी यांच्या 'द फॅमिली मॅन २' वेब सीरिजमध्ये एकूण नऊ भाग आहेत. या सर्व भागांमध्ये चेल्लम सरांचं पात्र वावरताना दिसते.
-
राज आणि डीके यांनी 'द फॅमिली मॅन २' चे दिग्दर्शन केले आहे.
-
दुसऱ्या सीजनमध्येही श्रीकांत तिवारी कथेचं मुख्य पात्र आहे. तो एनआयएची नोकरी सोडून एक साधी नोकरी करत सर्वसामान्यांप्रमाणे आयुष्य जगत असतो.
-
चेल्लम सर हे पात्र 'एनआयए'शीच संबंधित आहे. मात्र, ते सेवानिवृत्त झालेलं आहे. कामामुळे चेल्लम सरांना सर्व माहिती असते.
-
बेव सीरिजमधील प्रमुख पात्र श्रीकांत तिवारी अडचण आली की चेल्लम सरांना फोन करत असते.
-
अनेक वेळा चेल्लम सर स्वतःहून श्रीकांतला माहिती देतात. विशेषतः मोहिमेदरम्यान चेल्लम सरांची श्रीकांतला खूप मदत होते.
-
एनआयएची नोकरी सोडून एक साधी नोकरी करत सर्वसामान्यांप्रमाणे आयुष्य जगत असतानाच श्रीकांत चेल्लम सरांकडून माहिती घेण्यास सुरूवात करतो.
-
दोन सीझनच्या यशानंतर आता निर्मात्यांनी या वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनची तयारीही सुरू केली आहे. यावेळी श्रीकांत तिवारी आणि त्याच्या टीमसाठी पूर्णपणे नवीन मिशन असणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावेळी श्रीकांत आणि त्याची टीम चीनी शत्रुशी दोन हात करताना दिसणार असल्याचं बोललं जात आहे.

तब्बल ३० वर्षांनंतर कर्मदाता शनिदेव ‘या’ ३ राशींना बनवणार करोडपती! प्रचंड श्रीमंती अन् आयुष्यात येणार भरभरुन सुख