-
करोना लॉकडाऊनमुळे अनेकजण घरुनच काम करत असल्यामुळे इंटरनेटचा वापर वाढला आहे. अर्थात वर्क फ्रॉम होममुळे लॅपटॉपवर काम करताना इंटरनेटचा वापर वाढणं ही सहाजिक गोष्ट आहे. मात्र याचबरोबर गुगल ट्रेण्डसमधून भारतीयांसंदर्भात एक आश्चर्यकारिक माहिती समोर आलीय. ()
-
गुगल ट्रेण्डमध्ये मागील पाच वर्षांचा डेटा पाहिल्यास पहिल्यांदाच भारतामध्ये फ्री पॉर्नपेक्षा ट्रेडिंग म्हणजेच शेअर बाजार ट्रेण्डिंगसंदर्भातील सर्च अधिक प्रमाणात होत असल्याचं दिसून येत आहेत. गुगल ट्रेण्डवर मागील पाच वर्षाच्या डेटामध्ये २०२० साली नोव्हेंबर महिन्यानंतर या वर्षी फेब्रुवारी आणि मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर free porn या सर्चचा ग्राफ हा trading सर्चच्या ग्राफखाली दिसत आहे. म्हणजेच आता भारतीय फ्रि पॉर्नपेक्षाही ट्रेडिंगबद्दल जास्त प्रमाणात गुगल सर्च करत आहेत. (सर्व फोटो गुगल ट्रेण्डवरुन साभार)
-
पाच वर्षांमधील डेटा पाहिल्यास मध्य भारताबरोबरच पूर्वेकडील राज्यांमध्ये free porn संदर्भातील सर्च हा trading सर्चपेक्षा अधिक असल्याचे दिसत आहे.
-
पॉर्न सर्च करताना कोणत्या कोणत्या किवर्ड्सचे सर्वाधिक सर्च करण्यात येते आणि कोणत्या राज्यांमध्ये अधिक सर्च केले जाते यासंदर्भातील हा नकाशा पाहिल्यास मिझोरम आघाडीवर दिसत असून इतर राज्यांच्या तुलनेत गुजरातमधूनही पॉर्नसंदर्भात अधिक सर्च होत असल्याचं स्पष्ट होतं.
-
ट्रेडिंगसंदर्भात सर्च करण्यामध्ये महाराष्ट्र अव्वल स्थानी असल्याचे दिसून येते. त्याचबरोबर दाक्षिणात्य राज्यांमध्येही ट्रेडिंगसंदर्भात सर्च करण्याचं प्रमाण बरंच असल्याचं दिसतंय.
-
महाराष्ट्रामध्ये free porn आणि trading सर्च करण्याची तुलना केल्यास ट्रेडिंग सर्च करणाऱ्याची टक्केवारी ४० आहे तर पॉर्नसंदर्भात सर्च करण्यांची टक्केवारी ६० इतकी आहे.
-
पॉर्न सर्चसंदर्भात आघाडीवर असणाऱ्या मिझोरममध्ये free porn आणि trading सर्च करण्याचे प्रमाणे अनुक्रमे ९६ आणि ४ टक्के इतकं आहे.
-
महाराष्ट्राच्या शेजरी असणाऱ्या गुजरातमध्ये ७६ टक्के प्रमाण हे free porn सर्च करण्याचं आहे तर २४ टक्के प्रमाण हे trading सर्च करण्यासंदर्भातील आहे. विशेष म्हणजे शेअर बाजारामध्ये गुजराती वर्ग अधिक असतो असं म्हटलं जात असतानाही हा विरोधाभास दिसून येतोय.
-
पश्चिमेतील इतर राज्यांच्या तुलनेत गुजरातमधून free porn संदर्भात अधिक सर्च होत असल्याचं दिसतं. गुजरातमधील या विषयाचा सर्च इंट्रेस्ट रेट हा ३७ टक्के इतका आहे.
-
याच सर्च इंट्रेस्ट रेटसंदर्भात महाराष्ट्र आणि गुजरातची तुलना ट्रेडिंगबद्दलच्या सर्चवरुन करायची झाल्यास महाराष्ट्र हा ट्रेडिंगसंदर्भातील सर्चमध्ये अव्वल असल्याने सर्च इंट्रेस्ट हा १०० टक्के आहे तर गुजरातसाठी ही आकडेवारी ७८ टक्के इतकी आहे.
-
दाक्षिणात्य राज्यांमध्ये म्हणजेच कर्नाटक, केरळ, तामिळनाडूमध्येही ट्रेडींगसंदर्भातील सर्च अधिक दिसतोय. या राज्यांमध्ये अनुक्रमे ट्रेडिंगसंदर्भातील सर्च इंट्रेस्टचं प्रमाण ९४ टक्के, ९५ टक्के आणि ८५ टक्के इतके आहे.
-
मागील वर्षभरामध्ये ट्रेडिंगसंदर्भातील सर्चमध्ये सातत्याने वाढ होताना पहायला मिळत आहे. ८ ते १४ नोव्हेंबरच्या आठवड्यामध्ये यामध्ये मोठ्याप्रमाणात वाढ झाल्याचे दिसते. विशेष म्हणजे हाच आठवडा नोटबंदीला पाच वर्षे पूर्ण झाल्याचा आठवडा होता. त्यानंतर आता पुन्हा ट्रेडिंगसंदर्भातील सर्च वाढलाय.

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल