-
ओडिशामधील गंजम जिल्ह्यामधील कांतेई कोली या छोट्याश्या गावात राहणाऱ्या अरुण साहू या कलाकाराने संपूर्ण हनुमान चालीसा लाकडावर कोरली आहे. (सर्व फोटो एएनआयवरुन साभार)
-
लॉकडाउनच्या कालावधीचा उपयोग करुन घेत साहू यांनी लाकडात संपूर्ण हनुमान चालीसा कोरली आहे.
-
साहू यांनी एएनआयशी, "लॉकडाउनच्या कालावधीमध्ये काहीतरी वेगळी गोष्ट निर्माण करावी असं माझ्या मनात होता. त्यावेळी हिंदीमधून हनुमान चालीसा लाकडावर कोरुन काढावी असा विचार माझ्या डोक्यात आला," असं सांगितलं.
-
अरुण यांनी लाकडामधून दोन हनुमान चालीसा साकराल्या आहे.
-
आता लाकडात कोरलेल्या या हनुमान चालीसा ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेट म्हणून देण्याची इच्छा साहू यांनी व्यक्त केलीय.
-
"मला ही हनुमान चालीसा पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि दुसरी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना भेट द्याचची आहे," असं साहू म्हणालेत.
-
मागील दहा वर्षांपासून साहू लाकडं कोरुन कलाकृती तयार करत आहेत. अरुण यांनी मागील वर्षी लाकडातून साकारलेल्या कलाकृतींसाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
-
यापूर्वी साहू यांनी ताज महाल, गेट वे ऑफ इंडिया, पॅरिसमधील आयफेल टॉवर, इंडिया गेट यासारख्या इमारतींच्या लाकडी कलाकृतीही तयार केल्यात.
-
माझ्या जिल्ह्यामध्ये मला कलाकृतींचं एक छोटं संग्रहालय साकारण्याची माझी इच्छा असल्याचं साहू सांगतात.
-
या संग्रहालयामध्ये मी वेगवेगळ्या लोकप्रिय जागांच्या कलाकृती आणि मंदिरांच्या प्रतिमा ठेवणार आहे, असं साहू सांगतात.

भर बसस्थानकात तरुणाचं घाणेरडं कृत्य! महिलांसमोर जाऊन बसला अन्…, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “अशांना चोपलंच पाहिजे”