-
भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यावसायिकांपैकी एक असलेले मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानींचा आज वाढदिवस आहे.
-
जगातल्या सर्वांत श्रीमंत व्यक्तींपैकी एक असाल तर अर्थातच तुमची हौससुद्धा तितकीच महागडी असेल.
-
रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी यांना मौल्यवान दागिन्यांपासून महागड्या घडाळ्यांपर्यंत अनेक गोष्टींची आवड आहे.
-
नीता अंबानी या वेस्टर्न लूकसोबतच ट्रेडिशनल आऊटफिटमध्येही पाहायला मिळतात.
-
नीता अंबानी यांना अनेकदा अत्यंत महागड्या साड्यांमध्ये पाहिलं गेलंय.
-
मीडिया रिपोर्टनुसार, मुलगा आकाश अंबानीच्या साखरपुड्यात नीता अंबानी यांनी जवळपास ४० लाख रुपयांची साडी नेसली होती.
-
कौटुंबिक कार्यक्रम किंवा लग्नसमारंभात त्या नेहमी भरजरी दागिन्यांमध्ये पाहायला मिळतात.
-
त्यांची ही डिझायनर ज्वेलरी अत्यंत महागडी आहे.
-
नीता अंबानींना स्टायलिश फुटवेअरचीही आवड आहे.
-
त्यांच्याकडे पेड्रो, गार्सिया, जिम्मी चू, पेलमोडा, मार्लिन यांसारख्या मोठमोठ्या ब्रॅण्डच्या चपला व सँडल आहेत. या ब्रॅण्डच्या चपलांची किंमत लाखांपासून सुरू होते.
-
नीता अंबानी अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये बुल्गारी, कार्टियर, राडो, गुची, केल्विन केलिन आणि फोसिल यांसारख्या ब्रॅण्डची घड्याळं वापरताना पाहायला मिळतात.
-
या ब्रॅण्डच्या घडाळ्यांची किंमत दीड लाख रुपयांपासून सुरू होते.
-
जगातील सर्वांत महागड्या ब्रॅण्डच्या हँडबँग नीता अंबानी वापरतात.
-
त्यांच्या या हँडबँग्सची किंमत नेहमीच चर्चेचा विषय असते.
-
त्यांच्याकडे शनेल, गोयार्ड आणि जिम्मी चू केरी मौजू यांसारख्या ब्रॅण्डचे हँडबँग कलेक्शन आहे.

Ajit Pawar : पोलीस उपअधीक्षकाची आंदोलकाला फिल्मी स्टाईलने लाथ; जालन्यातील घटनेवर अजित पवार म्हणाले…