-
Gujarat Weather Change rain: गुजरातमधील हवामानात आता अचानक बदल झाला आहे. हिवाळ्यात बहुतांश भागात पावसाळ्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. ठिकठिकाणी कडकडाटासह पावसाच्या सरीही कोसळू लागल्या आहेत. तर गुजरातमधील काही भागात गारपिटीचे दृश्यही पाहायला मिळाले.
-
हिवाळ्यातही पावसाळ्यासारखे वातावरण निर्माण झाले आहे. हवामानातील बदलामुळे गुजरातमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. जुनागढ, कच्छ, गीर-सोमनाथ, उना, गोडल, जेतपूरसह अनेक भाग सौराष्ट्रात प्रभावित झाले आहेत. मोरबीमध्ये गारांसह पाऊस झाला.
-
अवकाळी पाऊस झाल्यास पिके रोगट होऊन नष्ट होण्याची भीती आहे. सध्या बहुतांश शेतकऱ्यांनी गहू, ज्वारी, मूग या पिकांची लागवड केली आहे. त्यानंतर पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरीही संभ्रमात पडले आहेत.
-
वादळी वाऱ्यामुळे चिकू, ज्वारी, कापूस या पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे. अवकाळी पाऊस झाल्यास पिके रोगट होऊन नष्ट होण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. दुसरीकडे, मोरबीमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यामुळे सिरॅमिक कारखान्याचे छत उडून गेले.
-
राजकोटमधील कुवाडवा रोडच्या मलियासनजवळ रस्त्यावर बर्फ पसरला. बर्फाने रस्ता झाकला असल्याने लोक रस्त्यावर मनालीसारख्या वातावरणाचा आनंद घेत आहेत. लोक रस्त्यावर बर्फामध्ये मस्ती करताना दिसले. (सर्व फोटो – गुजरात इंडियन एक्सप्रेस)

MI vs GT: मुंबई इंडियन्सचा अखेरच्या चेंडूवर अनपेक्षित पराभव, हार्दिकचा डायरेक्ट हिट चुकला अन् असा जिंकला गुजरात संघ; अखेरच्या षटकात काय घडलं?