• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राज ठाकरे
  • बच्चू कडू
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. union budget 2025 finance minister look how nirmala sitharaman sarees represent india s culture spl

Photos : निर्मला सीतारमण यांना ही साडी कोणी भेट दिली आहे? या राज्याशी आहे खास कनेक्शन…

Who’s gifted saree did Nirmala Sitharaman wear: दरवेळेप्रमाणेच यावेळीही निर्मला सीतारमण बजेट सादर करण्यासाठी साडी परिधान करून पोहोचल्या होत्या. या साडीचा भारतातील एका राज्याशी विशेष संबंध आहे.

February 1, 2025 15:55 IST
Follow Us
  • Nirmala Sitharaman Saree
    1/14

    अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला आहे. निर्मला सीतारमण यांचे हे सलग आठवे बजेट होते. (एक्सप्रेस फोटो: प्रवीण खन्ना)

  • 2/14

    निर्मला सीतारमण जेव्हा-जेव्हा अर्थसंकल्प सादर करतात तेव्हा त्यांचा लूक खूप चर्चेत येतो. (प्रवीण खन्ना यांचे एक्सप्रेस फोटो)

  • 3/14

    अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या या साडीचा भारताच्या संस्कृतीशी आणि कलेशी संबंध आहे. (प्रवीण खन्ना यांचे एक्सप्रेस फोटो)

  • 4/14

    दरवर्षीप्रमाणेच यावेळीही अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करण्यासाठी साडी परिधान करून पोहोचल्या होत्या, त्यांच्या या लूकची सर्वत्र चर्चा होत आहे. (एक्स्प्रेस फोटो प्रवीण खन्ना)

  • 5/14

    यंदा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करण्यासाठी सोनेरी रंगाचे काठ असलेली पांढरी साडी नेसली होती. (प्रवीण खन्ना यांचे एक्सप्रेस फोटो)

  • 6/14

    या साडीबरोबर अर्थमंत्र्यांनी लाल रंगाचा ब्लाउज परिधान केला होता आणि शालही घेतली होती. त्यांना ही साडी भेट म्हणून मिळाली आहे. (प्रवीण खन्ना यांचे एक्सप्रेस फोटो)

  • 7/14

    खरंतर ही साडी निर्मला सीतारमण यांना दुलारी देवी यांनी भेट दिली होती. दुलारी देवी या मिथिला आर्ट्ससाठी ओळखल्या जातात. २०२१ मध्ये, कलेतील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. (प्रवीण खन्ना यांचे एक्सप्रेस फोटो)

  • 8/14

    अशा परिस्थितीत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी भारताचा समृद्ध हातमाग आणि कापडाचा वारसा राष्ट्रीय मंचावर आणला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. (प्रवीण खन्ना यांचे एक्सप्रेस फोटो)

  • 9/14

    २०२१ मध्ये जेव्हा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दुलारी देवी यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी ही सुंदर साडी अर्थमंत्र्यांना भेट म्हणून दिली होती. (प्रवीण खन्ना यांचे एक्सप्रेस फोटो)

  • 10/14

    दुलारी देवी यांनी अर्थमंत्र्यांना अर्थसंकल्प सादर करताना ही साडी नेसण्याचे आवाहन केले होते. मधुबनी कलेचे उत्कृष्ट काम या साडीवर पाहायला मिळते. (प्रवीण खन्ना यांचे एक्सप्रेस फोटो)

  • 11/14

    २०१९ मध्ये, जेव्हा निर्मला सीतारमण यांनी पहिल्यांदा बजेट सादर केले, तेव्हा त्यांनी पारंपारिक लेजरसह बजेट ब्रीफकेसही बदलली. (प्रवीण खन्ना यांचे एक्सप्रेस फोटो)

  • 12/14

    यावेळीही त्यांनी साडी नेसली होती. त्यांचा साडीशी नक्कीच काहीतरी संबंध आहे. २०२२ चा अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी तपकिरी रंगाची साडी नेसली होती. (प्रवीण खन्ना यांचे एक्सप्रेस फोटो)

  • 13/14

    ती बोमकाई साडी होती ज्याद्वारे त्यांनी ओडिशाच्या हातमाग वारशाचा प्रचार केला होता. ओडिशामध्ये हे बोमकाई गाव आहे जिथे या बोमकाई साड्या बनवल्या जातात. (प्रवीण खन्ना यांचे एक्सप्रेस फोटो)

  • 14/14

    तर, २०२४ मध्ये अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कांथा एम्ब्रॉयडरी असलेली निळी सिल्क साडी नेसली होती. पश्चिम बंगालमधील ही एक लोकप्रिय हस्तकला आहे. (एक्स्प्रेस फोटो प्रवीण खन्ना) हेही पाहा- Budget 2025: यंदाच्या अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे, काय झालं स्वस्त? शेतकरी-विद्यार्थ्यांसाठी सीतारमण यांनी कोणत्या केल्या घोषणा?

TOPICS
अर्थसंकल्प २०२५ (Budget 2025)Budget 2025ट्रेंडिंगTrendingनिर्मला सीतारमणNirmala Sitharamanमराठी बातम्याMarathi News

Web Title: Union budget 2025 finance minister look how nirmala sitharaman sarees represent india s culture spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.