-
सध्या, महादेव नगरी काशीमध्ये जीवनदायिनी गंगा नदी पूरग्रस्त झाली आहे. परिस्थिती अशी आहे की गंगेच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडले आहे आणि सातत्याने वाढत आहे. (Photo: ANI)
-
पुरामुळे वाराणसीतील अनेक मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. विशेषतः घाटांवर बांधलेली अनेक मंदिरे पाण्याखाली गेली आहेत आणि आता पाणी शहरांमध्ये शिरले आहे. (Photo: ANI)
-
घाटावर बांधलेल्या घरांमध्ये पाणी शिरल्याने लोक छतावर आश्रय घेत आहेत किंवा स्थलांतर करत आहेत. (Photo: PTI)
-
वाराणसीमध्ये गंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे आणि ती ७२ मीटरपर्यंत पोहोचली आहे. ८४ घाट पाण्यात बुडाल्यानंतर आता पाणी शहरात शिरले आहे. (Photo: PTI)
-
दशाश्वमेध घाटाच्या तीन पायऱ्या शिल्लक आहेत. तर, शीतला घाटावरील मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. (Photo: PTI)
-
याशिवाय, सिंघिया घाटावर रत्नेश्वर महादेव मंदिराच्या शिखराचा फक्त एक भाग दिसतो आहे तर छोटी- छोटी मंदिर दिसेनाशी झाली आहेत. (Photo: PTI)
-
नमो घाटावर बांधलेल्या शिल्पाकृतीही बुडाल्या आहेत. घाटाच्या काठावर असलेल्या घरांचा तळ मजला जवळजवळ पाण्याखाली गेला आहे. (Photo: PTI)
-
हे अस्सी घाटाचे छायाचित्र आहे जिथे गंगेचे पाणी रस्त्यांवरून वाहत आहे. (Photo: PTI)
-
त्याच वेळी, मणिकर्णिका घाटावर लोक अंत्यविधीसाठी मृतदेहांना बोटींद्वारे स्मशानभूमीच्या छतावर पाठवत आहेत. (Photo: PTI)
-
याशिवाय, वरुणा नदीला आलेल्या पुरामुळे अनेक गावे बाधित झाली आहेत. (Photo: PTI)
-
सध्या परिस्थिती अशी आहे की पाणी शहरांमध्ये शिरल्यानंतर, अनेक लोकांना आपले घर सोडून इतर ठिकाणी आश्रय घ्यावा लागत आहे. (Photo: PTI)
-
हे छायाचित्र वाराणसीतील सर्वात वर्दळीच्या गोदौलिया चौकाचे आहे, जिथे रस्ते पाण्याने भरलेले आहेत. (Photo: PTI)
-
परिस्थिती अशी आहे की लोक त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी बोटींचा वापर करत आहेत. (Photo: PTI)
-
पहाडांमध्ये होणाऱ्या सततच्या पावसामुळे गंगेच्या पाण्याची पातळी सतत वाढत आहे. (Photo: PTI) हेही पाहा- “…मी कृतज्ञ आहे”; युजवेंद्र चहलच्या मुलाखतीनंतर धनश्री वर्मा दुबईत, सोशल मीडियावर व्यक्त केली भावना, चाहते म्हणाले, “शांतपणे दिलेलं उत्तर…”

अमेरिकेच्या भारताबद्दलच्या दाव्याला रशियाचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, “अमेरिका भारताच्या वस्तू घेणार नसेल तर…”