पिंपरी : प्रसुती झाल्यानंतर उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्या ईश्वरी (तनिषा) भिसे या महिलेच्या जुळ्या मुलींच्या उपचारांचा खर्च राज्य सरकारने उचलला आहे. बालकांवर उपचार सुरू असलेल्या वाकड येथील सूर्या मदर अँड चाइल्ड केअर या रुग्णालयाच्या बँक खात्यावर मुख्यमंत्री सहायता निधीतून २४ लाख रुपये शुक्रवारी वर्ग करण्यात आले आहेत.

याबाबतची प्रत मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी रुग्णालयाला पाठविली आहे.भाजप आमदार अमित गाेरखे यांचे स्वीय सहायक सुशांत भिसे यांच्या पत्नी ईश्वरी (तनिषा) भिसे यांनी जुळ्या मुलींना जन्म दिला. प्रसुतीनंतर ईश्वरी (तनिषा) भिसे यांचे निधन झाले.या बालकांवर वाकड येथील ‘सूर्या मदर अँड चाईल्ड केअर’या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बाळांच्या उपचारांचा खर्च भागविण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून २४ लाख रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर केले आहे.ही रक्कम शुक्रवारी रुग्णालयाच्या खात्यावर वर्ग करण्यात आल्याची माहिती आमदार गाेरखे यांनी दिली.