विवाहित तरुणीचा पाठलाग करुन तिला धमकावणाऱ्या संगणक अभियंत्याला पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी शुभम शिवाजी पुंड (वय २५, रा. अहमदनगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका २५ वर्षीय तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. शुभम पुंड आणि तक्रारदार तरुणी एकाच ठिकाणी काम करत होते. त्या वेळी त्यांची ओळख झाली होती. ओळखीतून दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. शुभमचे दुसऱ्या एका तरुणीशी प्रेमसंबंध असल्याचे तक्रारदार तरुणीला समजल्यानंतर तिने त्याच्याशी संबंध तोडले. दरम्यान, तक्रारदार तरुणीचा विवाह झाला. त्यानंतर शुभमने विवाहित तरुणीला त्रास देण्यास सुरुवात केली. कामावरुन घरी परतणाऱ्या तरुणीचा पाठलाग करुन तिला त्रास देण्यास सुरुवात केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तरुणीच्या छायाचित्रांचा गैरवापर केला. त्यात काही बदल करुन पती आणि बहिणीला पाठविले. त्यानंतर शुभमने तरुणीच्या पतीच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. ‘पत्नीला घटस्फोट दे नाहीतर मी बरेबाईट करुन घेईन. त्यास तुम्ही जबाबदार असाल,’ अशी धमकी त्याने तरुणीच्या पतीला दिली. घाबरलेल्या तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक थोरात तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A case against a computer engineer who threatened a married woman pune print news amy